गेले काही महिने सुरू असलेल्या भारत-चीन संघर्ष आता वेगळ्या दिशेने जात आहे. दोन्ही देशांच्या सैनिकांनी महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.
भारत आणि चीनने पूर्व लडाखमधील दुसर्या सीमा स्थानातून सैन्य मागे घेतले आहे, ज्याला विश्लेषकांकडून सकारात्मक पाऊल म्हणून पाहिले जात आहे. भारतीय लष्कराने शुक्रवारी सांगितले की, दोन्ही देशांचे सैनिक गोगरा पोस्टमधून बाहेर पडले आहेत. गोग्रा, किंवा पेट्रोलिंग पॉईंट १७ ए ग्रस्तीवरून आता दोन्ही देशांचे सैन्य गेल्या १५ महिन्यांपासून संघर्षात गुंतलेले होते. याबाबतची अधिकृत घोषणा आता करण्यात आलेली आहे. तसेच संबंधित भागात तात्पुरत्या स्वरूपातील बांधकामे देखील हटविण्यात आलेली आहेत.
या आठवड्याच्या सुरुवातीला पूर्ण झालेली विलगता, गेल्या शनिवारी झालेल्या वरिष्ठ कमांडरांच्या स्तरावरील १२ व्या चर्चेचा निकाल होता, असे भारतीय लष्कराने म्हटले आहे. करारानुसार, दोन्ही बाजूंनी या भागात टप्प्याटप्प्याने, समन्वयित आणि सत्यापित पद्धतीने पुढे तैनात करणे थांबवले आहे. ४ आणि ५ ऑगस्ट या दोन दिवसात विस्थापन प्रक्रिया पार पडली. दोन्ही बाजूंचे सैन्य आता आपापल्या स्थायी तळांवर आहेत, अशी माहिती लष्कराकडून देण्यात आली.
हे ही वाचा:
कृत्रिम तलावाकरिता आर्थिक तरतूदच नाही
भारतात ‘या’ लसीला मिळाली परवानगी
राऊत यांचा मेजर ध्यानचंद यांच्या नावाला विरोध आहे का?
मागील एक वर्षे जवळपास लडाख सीमेवर प्रचंड तणावाचे वातावरण होते. गलवान हिंसक झटापटीनंतर हे वातावरण अधिक तापले. त्यानंतर भारतीय आणि चीन सैन्य समोरासमोर उभे ठाकले होते. ताबारेषीवरील स्थिती पूर्ववत होण्यासाठी दोन्ही बाजूंचे राजनैतिक आणि लष्करी पातळीवर वाटाघटांची प्रयत्न अद्यापही सुरूच आहेत. अलिकडेच दोन्ही देशांदरम्यान चर्चेची १२ वी फेरी झाली होती. यामध्ये सात तासांपेक्षा जास्त कालावधी चर्चा झालेली होती. परंतु या चर्चेचा कुठलाही तपशील मात्र दोन्ही देशांकडून देण्यात आलेला नव्हता. अखेरीस गोगरा भागातील १७ ए या गस्तबिंदूवरून दोन्ही सैन्य मागे हटल्यानंतर औपचारिक घोषण परराष्ट्र मंत्रालयाकडून करण्यात आली.