29 C
Mumbai
Tuesday, December 17, 2024
घरदेश दुनियाएलएसीवर 'चढलेला पारा' उतरला?

एलएसीवर ‘चढलेला पारा’ उतरला?

चीनच्या उपद्व्यापांमुळे लडाख येथील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र दोन्ही देशांतील सैन्याधिकाऱ्यांमधील झालेल्या चर्चेमुळे आता दोन्ही देशांमधील तणाव निवळण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे एलएसीवर 'चढलेला पारा' हळूहळू उतरत आहे.

Google News Follow

Related

भारत-चीन दोन्ही देशांनी पँगाँग या तलावाच्या दक्षिणेकडून माघार घ्यायला सुरूवात केली आहे. त्यामुळे अनेक महिने प्रलंबित असलेला प्रश्नावर आश्वासक तोडगा निघाला असल्याचे चित्र सध्या तरी दिसत आहे.

सुत्राकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार फौज अजूनही मोक्याच्या स्थानावर आपली जागा टिकवून आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरून चीनी सैन्याने माघार घ्यायला सुरूवात केल्याचे चीनी संरक्षण मंत्रालयाने घोषित केल्यानंतर त्यांनी सांगितले. याबरोबरच पूर्व लडाख मधल्या अनेक विवादीत स्थानांवरून चीनी सैन्याने माघार घ्यायला सुरूवात केली आहे. दिनांक २४ जानेवारी रोजी दोन्ही सैन्याच्या सैन्याधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकी नंतर या हालचालींना सुरूवात झाली आहे.

चीनी संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते वू किआन यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार भारतीय आणि चीनी सैन्याने चर्चेच्या ९व्या फेरीत मान्य केलेल्या सीमेपर्यंत माघार घ्यायला दिनांक १० फेब्रुवारी रोजी सुरूवात केली आहे.

सैन्याने एकाच वेळेस आणि पद्धतशीरपणे माघार घेण्यास सुरूवात केली असल्याचे देखील वू यांनी त्यांच्या पत्रकात म्हटले आहे. चीनी संरक्षण मंत्रालयाने माघारीबद्दल अधिक माहिती दिलेली नाही. त्याबरोबरच रणगाडे आणि गाड्यांच्या माघारीबाबत भारताच्या संरक्षण आणि परराष्ट्र मंत्रालयातर्फे कोणतेही पत्रक प्रसिद्ध करण्यात आलेले नाही.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
214,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा