काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या ‘शक्ती’ टिप्पणीवर पंतप्रधान मोदींनी जबरदस्त हल्ला चढवला आहे.इंडी आघाडी ज्या ‘शक्ती’ विरुद्ध लढत आहे, त्याची मी पूजा करतो, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.भारताचा विरोध पक्ष हा ‘हिंदू शक्ती’ नष्ट करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप पंतप्रधान मोदींनी केला.पंतप्रधान मोदी यांनी सोमवारी(१८ मार्च) तेलंगणातील जगतियाल येथील जाहीर सभेला संबोधित करताना विरोधी पक्षावर टीका केली.
राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप काल (१७ मार्च) मुंबईत झाला.मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये समारोप सोहळा पार पडला.या कार्यक्रमाला इंडी आघाडीतील बडे नेते उपस्थित होते.यावेळी राहुल गांधी यांनी “शक्तीचा” उल्लेख करत सरकारवर निशाणा साधला होता. “हिंदू धर्मात एक ‘शक्ती’ आहे.आमची लढाई भाजप अथवा मोदी विरोधात नाही तर शक्ती विरोधात आहे, असे राहुल गांधी यांनी काल आपल्या भाषणात म्हटले होते.राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर पंतप्रधान मोदींनी उत्तर देत टीका केली आहे.
हे ही वाचा:
“आयपीएलच्या आगामी हंगामात रोहित शर्मासोबत खेळण्यास उत्सुक”
“इंडी आघाडीतील नेत्यांची सभा म्हणजे ‘फॅमिली’ गॅदरिंग”
रमझानच्या दिवशी दुकान उघडे ठेवले म्हणून बांगलादेशात हिंदू व्यक्तीला मारहाण
हरवलेल्या दोन भावांचे मृतदेह आढळले मनपा पाण्याच्या टाकीत!
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, इंडी आघाडीने म्हटले की, त्यांचा लढा हा ‘शक्ती’ विरुद्ध आहे.पंतप्रधान पुढे म्हणाले की, माझ्यासाठी प्रत्येक आई, मुलगी आणि बहीण हे ‘शक्ती’चे रूप आहे. मी ‘शक्ती’च्या रूपात त्यांची पूजा करतो.मी भारत मातेचा उपासक आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, भारताचा विरोध पक्ष हा ‘हिंदू शक्ती’ नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे.
पंतप्रधान म्हणाले, मी या शक्ती स्वरूपातील माता-बहिणींच्या संरक्षणासाठी जीवाची बाजी लावायला तयार आहे.तर मला सांगा शक्तीला संपवणाऱ्यांना आपण संधी द्याल का?, असा प्रश्न देखील मोदींनी जनतेला विचारला.तसेच विरोधक शक्तीला संपवण्याचा विचार करत आहेत.परंतु, कोण शक्तीचा आशीर्वाद मिळवतं आणि कोण शक्तीला संपवत ते चार जूनला स्पष्ट होईल, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.