‘एसिआन-इंडिया’ परिशद आणि १८व्या पूर्व आशियाई परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी इंडोनेशियात दाखल झाले. ‘एसियान-इंडिया’ परिषदेचे सह अध्यक्षपद भूषवणे, ही गर्वाची बाब असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र यांनी यावेळी केले.
‘गेल्या वर्षी आपण भारत-आसियान मैत्री दिवस साजरा केला आणि त्याला सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीचे स्वरूप दिले. आपल्या भागीदारीचे हे चौथे दशक सुरू आहे. या शिखर परिषदेचे सह-अध्यक्ष होणे माझ्यासाठी गौरवास्पद आहे. या शिखर परिषदेचे आयोजन केल्याबद्दल मी इंडोनेशियाचे राष्ट्रपती जोको विडोडो यांचे अभिनंदन करू इच्छितो,’ असे पंतप्रधान मोदी यांनी जकार्ता येथे आसियान-भारत शिखर परिषदेला संबोधित करताना सांगितले.
Had a very short but fruitful Indonesia visit, where I met ASEAN and other leaders. I thank President @jokowi, the Indonesian Government and people for their welcome. pic.twitter.com/wY82TMzDvY
— Narendra Modi (@narendramodi) September 7, 2023
पंतप्रधान मोदींनी जकार्तामध्ये भारतीय समुदाय त्यांचे स्वागत करतानाची छायाचित्रे शेअर केली. याआधी, परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनीही जकार्ता येथील पंतप्रधान मोदींची छायाचित्रे पोस्ट केली होती. आसियान-भारत शिखर परिषदेनंतर मोदी दिल्लीला परतणार आहेत. ९ आणि १० सप्टेंबर रोजी नवी दिल्लीत जी २० शिखर परिषद होत आहे.
हे ही वाचा:
जपानच्या अंतराळ संशोधकांना सापडला पृथ्वीसदृश्य ग्रह
दहीहंडीच्या दिवशी ढगांचे थर आणि वर्षोल्हास
निजामकालीन नोंदी आहेत त्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देणार!
‘भारत उत्पादनाचे नवीन केंद्र असेल’
दिल्लीहून रवाना होण्यापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी या परिषदेबाबत सकारात्मक भाष्य केले होते. ‘भारत आणि आसियान यांच्यातील सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीमुळे संबंधांमध्ये नवीन गतिशीलता आली आहे. आसियान सोबतचा सहभाग हा भारताच्या ‘ऍक्ट ईस्ट’ धोरणाचा एक महत्वाचा आधारस्तंभ आहे. हा मंच अन्न आणि ऊर्जा सुरक्षेसह पर्यावरण, आरोग्य आणि डिजिटल परिवर्तन या महत्त्वाच्या मुद्द्यांवर विचारविनिमय करण्याची उपयुक्त संधी प्रदान करतो. या जागतिक आव्हानांना एकत्रितपणे सामोरे जाण्यासाठी विविध उपाय योजण्याकरिता, विचारांची देवाणघेवाण करण्यास मी उत्सुक आहे,’ असे मोदी म्हणाले होते.