भारत-अमेरिकेने उघडपणे केले इस्रायलचे समर्थन

दोन्ही देश राजनैतिक मुद्द्यांवर एकमेकांशी सहमत

भारत-अमेरिकेने उघडपणे केले इस्रायलचे समर्थन

इस्रायल-हमास युद्धादरम्यान भारत आणि अमेरिकेदरम्यान पाचवी मंत्रिस्तरीय बैठक झाली. या बैठकीत दोन्ही देशांनी दहशतवादाविरोधातील कारवाईबाबत इस्रायलचे उघडपणे समर्थन केले. नवी दिल्लीत झालेल्या या बैठकीत संरक्षण आणि औद्योगिक क्षेत्रात भागीदारी वाढवण्याबाबतही चर्चा झाली. दोन्ही देश राजनैतिक मुद्द्यांवर सहमत आहेत.

 

दोन्ही देश जागतिक आणि राजनैतिक भागिदारी आणखी सुदृढ करण्याच्या दिशेने पाऊल उचलत आहेत, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉइड ऑस्टिन यांच्याशी चर्चा करताना स्पष्ट केले. तसेच, चीनच्या आक्रमकतेला आव्हान देण्यासाठी एकजूटही दाखवली. या संदर्भात महत्त्वाची बाब म्हणजे दोन्ही देशांनी पाकिस्तानचे नावही घेतले नाही.

 

दोन्ही देशांनी संयुक्तपणे दहशतवादी हल्ल्यांविरोधात इस्रायलच्या समर्थनाची घोषणा केली. अर्थात दोघांनीही हमासचे नाव घेतले नाही. तसेच, कोणत्याही देशाने आपल्या भूमीवर दहशतवादी कारवायांना थारा देता कामा नये, असे आवाहन करतानाच लश्कर-ए-तैबा यांसारख्या दहशतवादी संघटनेविरोधात कारवाईची मागणी केली. तसेच, दहशतवादाविरोधातील लढाईत इस्रायलला समर्थन देतानाच सर्व ओलिसांची तत्काळ सुटका करण्याची मागणीही त्यांनी केली. तसेच, मानवतावादी कायद्याचे पालन करण्याचे आणि सर्व नागरिकांच्या सुरक्षेची काळजी करण्याचे आवाहनही केले.

हे ही वाचा:

यवतमाळ जिल्ह्यात सीतामंदिराचा जीर्णोद्धार

हमासचा युनिट कमांडर ठार; हजारो नागरिकांनी उत्तर गाझा सोडले

सेहवाग पाकिस्तानला म्हणाला ‘झिंदाभाग’!

प्रभू श्रीरामाचा द्वेष करणारे अनेक नेते काँग्रेसमध्ये; प्रमोद कृष्णम यांचे खडे बोल!

भारतात चिलखती वाहनांच्या सहउत्पादनासाठी अमेरिका तयार

प्रीडेटर ड्रोन, जीई इंजिननंतर आता अमेरिका भारतात चिलखती वाहनांच्या सहउत्पादनासाठी तयार झाली आहे. शुक्रवारी नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत यावर एकमत झाले. या बैठकीत औद्योगिक तसेच, अंतराळाशी संबंधित कार्यक्रमांमध्ये भागीदारी वाढवण्याबाबतही चर्चा करण्यात आली. भारत अमेरिकेकडून ३१ एमक्यू ९बी ड्रोनची खरेदी करणार आहे. ती लवकरच भारताला मिळतील, यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू, असे आश्वासन अमेरिकेचे संरक्षण मंत्री ऑस्टिन यांनी स्पष्ट केले.

Exit mobile version