26 C
Mumbai
Friday, December 27, 2024
घरराजकारणलोकसभा निवडणूक निकालाआधी ‘इंडी’ गट अंदाज घेणार

लोकसभा निवडणूक निकालाआधी ‘इंडी’ गट अंदाज घेणार

इंटरपोलच्या माध्यमातून त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न

Google News Follow

Related

विरोधी पक्षांच्या इंडी आघाडीने शनिवार, १ जून रोजी दिल्लीत सर्व घटक पक्षांची बैठक बोलावल्याचे समजते. याच दिवशी लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अंतिम टप्प्याचे मतदान होत आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी लागणार आहे, या पार्श्वभूमीवर इंडी गटाच्या सर्व घटक पक्षांना बैठकीचे आमंत्रण देण्यात आले आहे.

मद्यघोटाळ्याशी संबंधित आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी सध्या जामिनावर असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, २ जून रोजी तिहार तुरुंगात शरण व्हायचे आहे. त्यामुळे या दिवसाच्या बरोबर एक दिवस आधी ही बैठक होत आहे. लोकसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर एकूणच आघाडीच्या कामगिरीचा आढावा आणि भविष्यातील नियोजनाबाबत या बैठकीत चर्चा केली जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

तमिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, बिहारचे माजी मुख्यमंत्री तेजस्वी यादव, समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव या सर्वांसह सर्व विरोधी पक्षांच्या प्रमुखांना या बैठकीचे आमंत्रण देण्यात आले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यातील निवडणुका शनिवारी पार पडल्यानंतर लगेचच काँग्रेसने इंडिया आघाडीने २७२ हा बहुमताचा आकडा पार केल्याचा आणि ३५० कडे घोडदौड सुरू असल्याचा दावा केला होता.

हे ही वाचा:

पापुआ न्यू गिनीमधील भूस्खलनात तब्बल २००० हुन अधिक लोकांचा मृत्यू!

वेदांतच्या ब्लड सॅम्पलची अदलाबदल करण्यासाठी पैसे पुरवणाऱ्याला अटक

रेमल चक्रीवादळाचा बंगालला तडाखा, एक मृत्यू, २ लाख लोक स्थलांतरित!

अंतरिम जामिनाच्या मुदतवाढीसाठी केजरीवालांची धावाधाव

काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी तर इंडिया गट एनडीएचा पराभव करत असल्याचे वक्तव्य केले होते. त्यांनी तर एनडीएचा पराभव होणार हे भविष्य वर्तवत पंतप्रधान नरेंद्र मोदी निवृत्त होत असल्याचेही भविष्य वर्तविले. ते म्हणतात, ‘निवडणुकीचे सहा टप्पे आता संपले आहेत. ४८६ जागांसाठी मतदान संपले आहे. निरोपाच्या वाटेवरील पंतप्रधान त्यांच्या निवृत्तीच्या योजना शोधू लागले आहेत. २०२४च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा टप्पा सुरू आहे. भाजपचे भवितव्य पूर्ण झाले आहे. हे स्पष्ट झाले आहे की ते ‘दक्षिण में साफ, और उत्तर, पश्चिम आणि पूर्व में हाफ आहेत,’ असे रमेश यांनी ‘एक्स’वर नमूद केले होते.

२०२४च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करण्यासाठी तब्बल २८ विरोधी पक्षांनी इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुझिव्ह अलायन्स (इंडिया) च्या बॅनरखाली एक महाआघाडी केली आहे

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा