27 C
Mumbai
Saturday, November 16, 2024
घरराजकारणझैलसिंग यांचा अपघात झाला की तो अपघाताचा देखावा होता?

झैलसिंग यांचा अपघात झाला की तो अपघाताचा देखावा होता?

Google News Follow

Related

झैलसिंग यांच्या नातवाने उपस्थित केला सवाल

माजी राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग यांचे नातू इंद्रजीतसिंग यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केल्यानंतर एक स्फोटक विधान करत खळबळ उडवून दिली.

इंद्रजितसिंग भाजप प्रवेशानंतर पत्रकारांशी बोलताना ग्यानी झैलसिंग यांच्या मृत्युबाबत संशय व्यक्त केला. झैलसिंग यांचा १९९४मध्ये वयाच्या ७८व्या वर्षी अपघाती मृत्यू झाला होता. त्याबद्दल इंद्रजितसिंग यांनी शंका उपस्थित केली.

ते म्हणाले की, माझे आजोबा झैलसिंग यांची इच्छा होती की, मी भाजपामध्ये जावे. ती इच्छा आज पूर्ण झाली आहे. त्यांचा जो अपघाती मृत्यू झाला तो खरोखरच अपघात होता की अपघात दाखविण्यात आला हे कळत नाही. पण त्यांनी काँग्रेस पक्षाबद्दल जी निष्ठा दाखविली त्याचे त्यांना काय फळ मिळाले हे आपण जाणताच.

ग्यानी झैलसिंग यांना भारताचे राष्ट्रपती म्हणून १९८२ ते १९८७ असा कार्यभार सांभाळला. झैलसिंग यांच्या राष्ट्रपतीपदाच्या काळात भारतातील प्रमुख अशा घटना घडल्या. त्यात ऑपरेशन ब्लू स्टार झाले, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या आणि १९८४ची शिखविरोधी दंगल अशा घटना झैलसिंग राष्ट्रपती असताना घडल्या.

हे ही वाचा:

संजय राऊतांचे अग्रलेख म्हणजे तालिबानी प्रवृत्तीचे उदाहरण

पुन्हा एकदा काँग्रेसने केला स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान

भूपेंद्र पटेल यांनी गुजरातचे १७वे मुख्यमंत्री पदभार स्वीकारला

कधी मिळणार आहे, चिपळूणच्या पूरग्रस्तांना मदत?

इंद्रजितसिंग यांनी नुकताच भाजपामध्ये प्रवेश केला. भारताचे माजी राष्ट्रपती ग्यानी झैल सिंग यांचे नातू इंद्रजीत सिंग हे भारतीय जनता पार्टीमध्ये सहभागी झाले आहेत. सोमवार १३ सप्टेंबर रोजी केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या पंजाब विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने हा पक्ष प्रवेश महत्त्वाचा मानला जात आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
191,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा