सत्ताधारी शिवसेनेने महापालिकेच्या तिजोरीची सफाई केली

सत्ताधारी शिवसेनेने महापालिकेच्या तिजोरीची सफाई केली

काल मुंबईसह सबंध कोकण किनारपट्टीने तौक्ते वादळामुळे निसर्गाचे रौद्ररुप पाहिले. या वादळाच्या तडाख्यामुळे ठिकठिकाणी पाऊस पडला, सोसाट्याच्या वाऱ्याने अनेक झाडे उन्मळून पडली. परंतु हा नियोजित मान्सुनचा पाऊस नसतानाही, थोड्याच पावसात मुंबईची तुंबई झालेली पहायला मिळाली. त्यामुळे नियोजित मान्सुनच्या झोडणाऱ्या पावसात सबंध मुंबईच पाण्याखाली जाणार की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी यावरून मुंबई महानगरपालिकेला लक्ष्य केले आहे.

दरवर्षी महानगरपालिकेकडून यंदा पाणी तुंबू नये यासाठी पुरेशी तयारी झाली असल्याचे सांगण्यात येते, परंतु दरवर्षीचा पाऊस मुंबई महानगरपालिकेच्या दाव्यांतील फोलपणा उघड करून दाखवतो. यंदा पावसाळा तोंडावर आलेला असाताना झालेल्या या पावसाने मुंबईची दैना उडालेली पाहिली. त्यामुळे सालाबादप्रमाणे यंदाही मुंबईत पाणी तुंबून नागरिकांचा खोळंबा होणार असल्याचे निश्चित झाले आहे.

हे ही वाचा:

देशात ३ लाखांपेक्षा कमी नवे कोरोना रुग्ण

कोविन आता प्रांतिक भाषांमध्येही उपलब्ध होणार

धक्कादायक! भाजपासारखा व्यापक विचार करा, खुर्शीद यांचा काँग्रेसला सल्ला

व्हेंटिलेटर्सवरून राजकारण कशाला करता; फडणवीसांचा सवाल

भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी यावरून सत्ताधारी शिवसेनेला लक्ष्य केले आहे. ट्वीटरवरून शिवसेनेवर टीका करताना, सत्ताधारी शिवसेनेने महापालिकेच्या तिजोरीची सफाई केली आहे अशी घणाघाती टीका त्यांनी केली आहे. ते ट्वीटमध्ये म्हणतात,

नियमित पावसाळा सुरू होण्यापूर्वी या चक्रीवादळाच्या टीचभर पावसाने मुंबई तुंबली. भर पावसात तर या वर्षी अख्ख्या मुंबईचा पोहण्याचा तलाव होणार बहुधा. नालेसफाईच्या नावाखाली सत्ताधारी शिवसेनेने महापालिकेच्या तिजोरीची सफाई केली आहे.

Exit mobile version