राज ठाकरेंच्या सुरक्षेत वाढ

राज ठाकरेंच्या सुरक्षेत वाढ

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे राजकीय वर्तुळात चांगलेच चर्चेत आहेत. त्यांच्या सभा आणि त्यांनी घेतलेली हिंदुत्तवाची भूमिका तसेच मशिदीवरील भोंग्यांविरोधात भूमिका घेतल्याने राज ठाकरे चर्चेत आहेत. दरम्यान, राज ठाकरेंना जीवे मारण्याची धमकी पत्राद्वारे देण्यात आली होती. त्यांनतर त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी धमकीच्या पत्रामध्ये उर्दू भाषेचा वापर केल्याचे सांगितले होते. त्यावेळी त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारने याची दाखल घ्यावी अशीही मागणी केली होती. त्यावेळी नांदगावकर यांनी राज ठाकरेंच्या केसाला जरी धक्का लागली तरी अख्खा महाराष्ट्र पेटेल असा इशारा दिला होता. त्यांनतर नांदगावकर यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेऊन धमकीच पत्र मिळाल्याची माहिती दिली होती.

राज ठाकरेंना आधीपासूनच वाय प्लस दर्जाची सुरक्षा आहे. आता राज ठाकरेंची ही वाय प्लस सुरक्षा राज्य सरकारने कायम ठेवली असून त्यामध्ये पोलिसांच्या संख्येत वाढ करण्यात आली आहे. त्यांच्या सुरक्षेत एका पोलीस अधिकाऱ्याची आणि अंमलदाराची वाढ करण्यात आली आहे.

हे ही वाचा:

मलिकांना जामीन नाहीच; पण खासगी रुग्णालयात उपचारांची परवानगी

‘सत्तेसाठी ठाकरे सरकारने हिंदुत्व गहाण ठेवले’

कराची बाजारपेठेत स्फोट; तीन ठार

एनआयएच्या अतिरिक्त पोलीस महासंचालक पदी अतुलचंद्र कुलकर्णींची नियुक्ती

दरम्यान, ‘अजानबाबत जे काही करत आहेत ते थांबवा अन्यथा तुम्हला आणि राज ठाकरेंना ठार करू, अशी धमकी पत्रातून देण्यात आली होती. तसेच हे पात्र हिंदूंतून असून, त्यामध्ये काही उर्दू शब्द असल्याचेही नांदगावकर यांनी सांगितले. धमकीचे पत्र कोणी दिले ही माहिती अजून समोर आलेली नाही. पण पोस्टातून नांदगावकर यांच्या कार्यालयात हे पत्र आले. नांदगावकर यांनी सांगितले की, राज ठाकरेंच्या सुरक्षेबद्दल वारंवार राज्य सरकारला सांगूनही त्यांनी दुर्लक्ष केले होते. आज जेव्हा धमकीच पत्र आलं तेव्हा राज्य सरकारने राज ठाकरेंच्या सुरक्षेत वाढ केली.

Exit mobile version