राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना तीन मार्च पर्यंत ईडीची कोठडी सुनावण्यात आली होती. मात्र त्यांच्या ईडी कोठडीत चार दिवसांची वाढ झाली असून ७ मार्च पर्यंत त्यांना कोठडीत राहावे लागणार आहे.
२३ फेब्रुवारीला त्यांना ३ मार्च पर्यंत ईडीची कोठडी सुनावली होती. मात्र २५ ते २८ फेब्रुवारी दरम्यान मलिक वैद्यकीय कारणास्तव रुग्णालयात होते. त्यामुळे त्यांची चौकशी करताआली नाही. म्हणून अनिल सिंग यांनी पुन्हा एकदा आरोपी नवाब मलिक यांची चौकशी करता यावी यासाठी रिमांडचा जादा अवधी मिळावा अशी मागणी केली होती. त्यानुसार न्यायालयाने मलिकांच्या कोठडीत वाढ केली आहे.
२३ फेब्रुवारीला ईडीने मालिकांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. तब्बल आठ तासांच्या चौकशीनंतर त्यांना ईडीने अटक केली होती. कुख्यात गुंड दाऊदशी संबंध आणि मनी लॉंड्रिंग प्रकरणात मलिकांना ईडीने अटक केले आहे. मालमत्ता खरेदी आणि गैरव्यवहार प्रकरणात मलिकांचा संबंध असल्याचा आरोप ईडीने केला आहे. याप्रकरणी ईडीने नवाब मलिक यांचा मुलगा फराज मलिक यालाही समन्स बजावले होते. यापूर्वी एजन्सीने मलिकचा भाऊ कप्तान मलिक यांनाही समन्स बजावले होते.
हे ही वाचा:
अधिवेशनापूर्वी नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजपाचे आंदोलन
पंतप्रधान नरेंद्र मोदी, रशिया राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्यात चर्चा; या विषयांवर केली चर्चा
ठाकरे सरकाने सादर केलेला मागासवर्गीय आयोगाचा अहवाल सर्वोच्च न्यायालयाने नाकारला
राज्यपालांच्या अभिभाषणात गोंधळ; राज्यपाल सभागृह सोडून निघाले
नेमका काय आरोप आहे?
मलिक यांच्यावर दाऊद इब्राहिमचे सहकारी हसीना पारकर, सलीम पटेल आणि सरदार खान यांच्यासह नवाब मलिक यांनी मुनिरा प्लंबरची मुंबईतील कुर्ला येथील वडिलोपार्जित मालमत्ता हडपण्याचा गुन्हेगारी कट रचला, असा ईडीचा आरोप आहे. या वडिलोपार्जित मालमत्तेची किंमत सुमारे तीनशे कोटी रुपये आहे. हा गुन्हा मनी लाँड्रिंगमधून झाल्याचा दावा ईडीने केला आहे.