26 C
Mumbai
Friday, November 8, 2024
घरराजकारणकेंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात इतकी वाढ

केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात इतकी वाढ

Google News Follow

Related

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना एक खुशखबर दिली आहे. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. बुधवार, ३० मार्च रोजी पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या पार पडलेल्या बैठकीत महागाई भत्त्याबाबतचा हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांसाठी आता महागाई भत्ता (DA) मध्ये तीन टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. तर त्यासोबतच पेन्शनधारकांसाठी महागाई सवलत (DR) वाढवण्यात आली आहे. या वर्षाच्या सुरूवातीपासून म्हणजेच १ जानेवारी २०२२ पासून हे नवे दर जारी करण्यास सरकारने मान्यता दिली आहे. ज्यामध्ये विद्यमान दर ३१ टक्के तसाच राहून त्या मूळ वेतन अथव पेन्शनमध्ये ३ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे.

ही वाढ सरकारच्या मंजूर निकषांनुसारच करण्यात आली आहे. ७ व्या केंद्रीय वेतन आयोगाच्या शिफारशींवर ही वाढ आधारित आहे.

हे ही वाचा:

आता खैर नाही! नरसंहाराच्या काश्मिरी फाइल्स पुन्हा उघडणार

महाराष्ट्रात मास्क मुक्ती नाहीच!

महाविकास आघाडीचे आणखीन २ नेते तुरुंगात जाणार?

कोकण रेल्वेची धमाकेदार कामगिरी! पंतप्रधान मोदींनीही केले कौतुक

महागाई भत्ता आणि महागाई सवलतीचा एकत्रित परिणाम म्हणून ९५४४.५० कोटी रुपये इतकी तरतूद प्रतिवर्ष करण्यात आली आहे. याचा फायदा सुमारे ४७.६७ लाख केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना होणार आहे. तर ६८.६२;लाख पेन्शनधारकही याचे लाभार्थी असणार आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
188,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा