काँग्रेसच्या कार्यक्रमात भारताच्या नकाशातून पीओके, अक्साई चीन गायब

कर्नाटकातील बेळगावी येथे काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीसाठी लावले बॅनर

काँग्रेसच्या कार्यक्रमात भारताच्या नकाशातून पीओके, अक्साई चीन गायब

कर्नाटकमधील बेळगावी येथे २६ आणि २७ डिसेंबर रोजी काँग्रेस कार्यकारिणीची बैठक होणार आहे. १९२४ मध्ये स्थापन झालेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे शताब्दी वर्ष म्हणून काँग्रेस पक्ष हे वर्ष साजरे करत आहे. या कार्यक्रमात सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह पक्षातील अनेक बडे नेते सहभागी होणार आहेत. मात्र, हा कार्यक्रम आता वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. शिवाय काँग्रेस पक्ष टीकेचा धनी ठरला आहे.

कर्नाटकातील बेळगावी येथे काँग्रेस कार्यकारिणीची बैठक होणार आहे. या कार्यक्रमासाठी काँग्रेस नेत्यांच्या स्वागतासाठी पोस्टर आणि बॅनर लावण्यात आले आहेत. यावर भारताचा चुकीचं नकाशा लावल्याचा आरोप केला जात असून आता काँग्रेसवर टीका केली जात आहे. बेळगावी शहराच्या प्रवेशद्वारावर लावण्यात आलेल्या या बॅनरमध्ये छापण्यात आलेल्या भारताच्या नकाशातून पाकव्याप्त काश्मीर (पीओके) आणि अक्साई चीनचे क्षेत्र गायब झाले आहे. त्यामुळे काँग्रेसवर सर्वच स्तरावरून टीका केली जात आहे. दरम्यान, बेळगावी अधिवेशनादरम्यान पोस्टरवर दाखवण्यात आलेल्या नकाशाबाबत काँग्रेसकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही.

हे ही वाचा : 

जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराची गाडी उलटून झालेल्या अपघातात महाराष्ट्रातील दोन जवान!

कल्याण:अल्पवयीन मुलीवर अत्याचार-हत्या प्रकरणी आरोपीला २ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी!

हरियाणात ख्रिसमसचा कार्यक्रम विहिंप, बजरंग दलाने उधळवला, हनुमान चालीसाचे पठण

भाजपाला गतवर्षी पेक्षा तीनपट अधिक धनलाभ! २,२४४ कोटी रूपयांच्या देणग्या

भाजपा आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय म्हणाले की, “काँग्रेसच्या कार्यक्रमात ही चूक असू शकत नाही. हा त्यांच्या तुष्टीकरणाच्या राजकारणाचा भाग आहे, ज्यांचा असा विश्वास आहे की भारतीय मुस्लिम भारतापेक्षा पाकिस्तानशी अधिक निष्ठावान आहेत. काँग्रेस ही दुसरी मुस्लिम लीग असून त्यांना पुन्हा भारत तोडायचा आहे,” असा आरोप अमित मालवीय यांनी केला आहे. भाजपच्या स्थानिक नगरसेविका श्रेया नाकाडी यांनी याबाबत संताप व्यक्त केला असून, “भारताचा मुकुट हरवला आहे. आता हा महात्मा गांधींचा भारत नसून सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधींचा भारत आहे,” अशी सणसणीत टीका केली आहे.

Exit mobile version