टुकार सरकार सत्तेवर असल्यास, राज्यात कायदा-सुव्यवस्थेच्या चिंधड्या उडणारच

टुकार सरकार सत्तेवर असल्यास, राज्यात कायदा-सुव्यवस्थेच्या चिंधड्या उडणारच

नागपुरातील कोविड केअर सेंटरमध्ये चार गुन्हेगारांनी तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे. “भाईला उलट उत्तरं देतो” म्हणत गुंडांनी हैदोस घातला. या प्रकरणात पोलिसांनी २ जणांना ताब्यात घेतलं आहे. यावरूनच, भाजपा आमदार आणि मुंबई भाजपाचे प्रभारी अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. राज्यातली कायदा आणि सुव्यवस्थेची दशा आणि ठाकरे सरकारमधील मंत्री या मुद्द्यांवरून भातखळकरांनी टीका केली आहे.

“भाईला उलट उत्तर देतो’ म्हणत नागपूरच्या कोविड सेंटरमध्ये गुंडांनी हैदोस घातल्याचे वृत्त आहे. पोलिसांकरवी खंडणी गोळा करणारे टुकार सरकार सत्तेवर असल्यास राज्यात कायदा-सुव्यवस्थेच्या चिंधड्या उडणे स्वाभाविकच. जिथे बलात्कारी मंत्र्याला साधी अटक होऊ शकत नाही तिथे गुंडांना कोणाची भीती?” असं ट्विट अतुल भातखळकर यांनी केलं आहे.

हे ही वाचा:

कोरोनामुळे नाही उपासमारीने आधी मरू

अजितदादांच्या मनात बहुजनांविषयी आकस

महाराष्ट्रात ५९ हजार ३१८ नवे कोरोना रुग्ण

तौक्तेचा तांडव: जळगावमध्ये झाड पडून दोन मुलींचा मृत्यू, आई गंभीर जखमी

प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानींच्या अँटिलीया या घराबाहेर स्फोटकं ठेऊन खंडणी मागण्याच्या आरोपात एपीआय सचिन वाझेला अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांचे वरिष्ठ आणि माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खळबळजनक आरोप केले. यामध्ये अनिल देशमुख यांनी पोलिसांना महिन्याला १०० कोटी रुपये गोळा करण्याचे आदेश दिल्याचंही सांगितलं. हे शंभर कोटी मुंबईतून कसे गोळा करायचे हेही त्यांनी सांगितलं. यामुळे शेवटी अनिल देशमुख यांना राजीनामाही द्यावा लागला होता.

Exit mobile version