बीबीसीच्या दिल्ली आणि मुंबई कार्यालयात मुंबई विभागाने आज छापे टाकले आहेत. या छाप्यामध्ये कर्मचाऱ्यांचे मोबाइल फोन जप्त करण्यात आले असून सर्व कर्मचाऱ्यांना बाहेर पडण्यास मनाई केली आहे. केंद्र सरकारने २० जानेवारी २००२ च्या गुजरात दंगलींवर आधारित बीबीसी डोक्यूमेंटरीच्या लिंकसह यूट्यूब आणि ट्विटर वर पोस्ट ब्लॉक करण्याचे निर्देश जारी केले आहेत. त्या पार्श्वभूमीवर या छाप्यांकडे पाहिले जात आहे. नवी दिल्लीतील बीबीसी कार्यालयात आयकर विभागाचे पथक दाखल झाले आहे.
Income Tax department is conducting survey at the BBC office in Delhi: Sources pic.twitter.com/vqBNUUiHTD
— ANI (@ANI) February 14, 2023
सध्याच्या काळात गुजरात दंगली आणि रशिया युक्रेन युद्धावर बनवलेल्या सीरिजमुळे बीबीसी सध्या चर्चेत आहेत. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ अर्थात सीबीडीटीच्या अधिकाऱ्यांनी दिल्ली कार्यालयात अधिकारी उपस्थित असल्याची पुष्टी दिली आहे. बीबीसी कर्मचाऱ्यांना त्यांचे फोन बंद ठेवायला सांगितले असून कोणालाही कार्यालयाच्या आवारात प्रवेश करण्यास किंवा आत जाण्यास परवानगी नाही. या सर्व बाबी बीबीसीच्या लंडन येथील कार्यालयात, या सर्व घडामोडींची माहिती देण्यात आली आहे. मागील आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाने २००२ गुजरात दंगलीवरील बीबीसी माहितीपटावर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली होती. ही याचिका तथ्यहीन असल्याचे म्हंटले आहे.
हे ही वाचा:
बालविवाहाविरोधात हिमंता बिस्व सर्मा का आहेत आक्रमक?
सर्वोच्च न्यायालयात थोड्याच वेळात उद्धव ठाकरे-शिंदे गटातील संघर्षावर सुनावणी
पुलावामा हल्ल्यातील जवानांना देशभरातून श्रद्धांजली
पहाटेच्या शपथविधीवरचा पडदा अखेर फडणवीसांनी उघडला; शरद पवार वैतागले
बीबीसीने काही दिवसांपूर्वी ‘मोदी द इंडिया क्वेश्चन हा माहितीपट प्रसिद्ध करण्यात आला होता. या माहितीपटाचे पडसाद संपूर्ण देशभरात उमटले होते. या पार्श्वभूमीवर आयकर विभाग बीबीसीच्या कार्यालयात दाखल झाल्याने ही चर्चा सुरु आहे असे बोलले जाते. बीबीसी ही आंतरराष्ट्रीय माध्यम समूह असून त्यांनी आयकर कायद्याच्या नियमांचा भंग झाल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर आयकर विभागाने हे सर्वेक्षण करण्यात येत असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान आयकर विभागाने दिल्ली नंतर मुंबईत असलेल्या बीबीसीच्या कार्यालयांवर ह्या सर्वेक्षण केल्याचे सांगितले जाते.