आता उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या मालमत्तेवर टाच

आता उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या मालमत्तेवर टाच

महाविकास आघाडीला दुसरा झटका

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना झालेल्या अटकेनंतर आता महाविकास आघाडी सरकारला आयकर विभागाकडून दुसरा झटका बसला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मालमत्तांवर आता आयकर विभागाने कारवाई सुरु केली आहे. या कारवाईमुळे आता अजित पवारांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे.

या कारवाईअंतर्गत अजित पवारांशी संबंधित कोट्यवधींची प्रॉपर्टी ‘अटॅच’ करण्यात आली आहे. त्यांच्या मालमत्तांवर आयकर विभागाची कारवाई झाली असून त्यांना ९० दिवसांच्या कालावधीमध्ये प्रॉपर्टी बेनामी नसल्याचे सिद्ध करावे लागणार आहे.

हे ही वाचा:

‘वसुली कांड प्रकरणातील ही तर प्याद्याची अटक’

धनत्रयोदशी: दिवाळी खरेदीच्या उत्साहाचा दिवस!

‘१०० कोटींपैकी पवार, उद्धव यांच्या खात्यात किती गेले?’

शिवसेनेचे दिवाळी मुबारक?

आयकर विभागाने केलेल्या बेनामी मालमत्तेवरील कारवाईमध्ये हजार कोटींपेक्षा जास्त रकमेची मालमत्ता असून या मालमत्तेवर कारवाई होत आहे. मालमत्ता प्रोव्हीजनली अटॅच करण्यात आली आहे. यामध्ये ६०० कोटींची जरंडेश्वर कारखान्याची मालमत्ता, साऊथ दिल्लीतील २० कोटींचा फ्लॅट, २५ कोटींचे मुंबईतील निर्मल हाऊस, गोव्यातील निलाय नावाचे रिसोर्ट तसेच महाराष्ट्रातील वेगवेगळ्या २७ ठिकाणच्या जमिनी यांचा समावेश आहे. ही संपूर्ण मालमत्ता ‘बेनामी’ ठरवण्यात आली आहे. आता ही संपूर्ण मालमत्ता बेनामी नसल्याचे अजित पवारांना सिद्ध करावे लागणार आहे. यासाठी त्यांना ९० दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे.

Exit mobile version