शिवसेना आमदार यामिनी जाधव यांची आमदारकी धोक्यात येण्याची चिन्ह आहेत. आयकर विभागाकडून यामिनी जाधव यांची आमदारकी रद्द करावी अशी मागणी करण्यात आली आहे. यामिनी जाधव यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात चुकीची माहिती दिल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत यामिनी जाधव या भायखळा मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकिटावर लढल्या होत्या. त्यांनी एमआयएमच्या वारीस पठाण यांचा पराभव करून निवडून आल्या होत्या. पण आता आयकर विभागाच्या या मागणीनंतर यामिनी जाधव यांच्या आमदारकीचे भवितव्य नेमके काय आहे? हा सवाल उपस्थित होत आहे.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी जाधव यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्या उत्पन्नाशी संबंधित काही बाबी लपवल्याचे आयकर विभागाचे म्हणणे आहे. जाधव यांच्या प्रतिज्ञापत्राच्या छाननीतुन या बाबी आयकर विभागाच्या निदर्शनास आल्या आहेत. कोलकाता येथील एका शेल कंपनी सोबत जाधव यांनी व्यवहार केल्याचे समोर आले आहे. तर त्यातून यामिनी जाधव, त्यांचे पती आणि कुटुंबियांनी उत्पन्न कमावल्याचे आयकर विभागाच्या निदर्शनास आले आहे.
हे ही वाचा:
पोलीस महासंचालकांचेच बनवले बनावट फेसबुक अकाऊंट
विवेक पाटीलांना ईडीचा दणका…२३४ कोटींची मालमत्ता जप्त
आता या माध्यमातून अमेरिकेची तालिबानवर कारवाई?
अश्रफ घनी यांच्यानंतर ‘या’ महत्वाच्या व्यक्तीनेही देश सोडला
जाधव यांनी प्रधान डीलर्स नावाच्या एका कंपनीसोबत कोट्यवधी रुपयांचे व्यवहार केल्याचे म्हटले आहे. पण हि कंपनी एक शेल कंपनी असल्याचे उघड झाले आहे. ही शेल कंपनी उदय महावर नावाचा व्यक्ती चालवत असल्याची माहिती समोर आली आहे. उदय महावरचे नाव या आधी नॅशनल हेराल्ड प्रकरणातही समोर आले होते. हा सर्व प्रकार लक्षात घेता आता यामिनी जाधव यांची आमदारकी जाणार का? हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.
दरम्यान या विषयावरून भारतीय जनता पार्टी अकर्मक झालेली दिसत आहे. भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विटरवरून जाधव यांच्या आमदारकीच्या मुद्द्यावरून ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. ठाकरे सरकारला डल्लामार सरकार म्हणात भातखळकरांनी हल्ला चढवला आहे.