34 C
Mumbai
Saturday, November 2, 2024
घरराजकारणबंगालमधील अराजकता लोकशाही मूल्यांचा अस्त करणारी

बंगालमधील अराजकता लोकशाही मूल्यांचा अस्त करणारी

Google News Follow

Related

मुंबई भाजपा प्रमुख मंगलप्रभात लोढांची टीका

पश्चिम बंगालमधील वाढती अराजकता हा चिंतेचा विषय असून बंगालमधील सीबीआय कार्यालयाबाहेर तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून सुरू असलेली निदर्शने आणि दगडफेक हे दृश्य लोकशाही तत्त्वे संपुष्टात आणण्यासाठी सुरू असलेली परदेशातील कारस्थाने आहेत, असे मत मुंबई भाजपाचे अध्यक्ष व आमदार मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केले आहे. त्यांनी ट्विट करून बंगालमधील या परिस्थितीवर भाष्य केले. सीबीआय कार्यालयावर झालेला हल्ला हा भारतीय संविधानाला दिलेले आव्हान असून दहशतवाद आणि नक्षलवादाने प्रेरित असे हे कृत्य आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

हे ही वाचा:

नौदलाने वाचवले १४६ मच्छिमारांना

जिल्हा जिंकला तर देश जिंकेल, मोदींचा जिल्हाधिकाऱ्यांना संदेश

२३ मे रोजी सर्व ऑनलाईन व्यवहार बंद?

स्पुतनिक-व्ही लस मुंबईत कधी? कुठे? किंमत काय?

२०१६च्या नारदा स्टिंग ऑपरेशन प्रकरणात तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांना अटक करण्यात आली. त्यांची सुटका करावी यासाठी आंदोलन छेडण्यात आले. निझाम पॅलेस येथील सीबीआयच्या कार्यालयाला आंदोलकांनी लक्ष्य केले तर राजभवनसमोरही आंदोलकांनी निदर्शने केली.

कोरोनाचा एकीकडे कहर सुरू असतानाही कोलकात्यातील रस्त्यांवर आंदोलने सुरू होती. तृणमूलच्या नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना कायदा हातात न घेण्याचे आवाहनही केले. या आंदोलनांमुळे पोलिसांना बंदोबस्त वाढवावा लागला. सकाळी सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी तृणमूलच्या चार नेत्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना कोलकात्याच्या सीबीआय मुख्यालयात नेण्यात आले. त्यानंतर बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूलच्या नेत्या ममता बॅनर्जी यादेखील तिथे पोहोचल्या आणि त्या सायंकाळपर्यंत तिथेच ठिय्या देऊन होत्या.

नारदा प्रकरणात तृणमूलच्या १३ जणांची नावे असून त्यातील या चार नेत्यांना सीबीआयने ताब्यात घेतले होते. २०१६च्या विधानसभा निवडणुकीआधी नारदा प्रकरण समोर आले होते. काही राजकीय नेते आणि पोलिस अधिकारी एका बनावट कंपनीकडून पैसे घेतानाचे स्टिंग या प्रकरणात करण्यात आले होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
186,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा