पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाचं लोकार्पण

ढोल ताश्यांच्या गजरात पंतप्रधान मोदींचे स्वागत

पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाचं लोकार्पण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महाराष्ट्र दौरा सुरु झाला आहे. सकाळी साडेनऊ वाजता पंतप्रधानांचे नागपूर विमानतळावर आगमन झाले. तेथून ते थेट रेल्वे स्थानकावर गेले. पंतप्रधान मोदींनी सर्वात प्रथम नागपूर-बिलासपूर वंदेभारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला आहे. यावेळी पंतप्रधान मोदींसोबत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि रावसाहेब दानवे उपस्थित होते.

पुढे त्यांनी फ्रीडम पार्क मेट्रो स्टेशनवर मेट्रो कॉरिडॉरच्या दोन टप्प्यांचे उद्घाटनही केले. त्याच मेट्रोमधून त्यांनी प्रवास केला. त्या प्रवासादरम्यान, मेट्रोमध्ये विद्यार्थी होते. विद्यार्थ्यांशी मनमोकळ्यापणाने पंतप्रधान मोदींनी संवाद साधला आहे.

पुढे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाचं लोकार्पण करण्यात आलं आहे. नागपूर शिर्डी टप्प्याचं उद्घाटन करण्यात आलं आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर नेते उपस्थित आहेत. वायफळ टोलनाक्यावर पंतप्रधान मोदी यांचे ढोल ताशाच्या गजरात स्वागत करण्यात आले. समृद्धी महामार्गाचं लोकार्पण झाल्यानंतर मोदींनाही ढोल वाजवण्याचा मोह आवरला नाही.

यावेळी पंतप्रधान मोदी यांनी एकनाथ शिंदे यांना कौतुकाची थाप दिल्याचे पाहायला मिळाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समृद्धी महामार्गासाठी केलेले प्रयत्न यासाठी मोदींनी त्यांना कौतुकाची थाप दिली.

हे ही वाचा: 

ठाकरे गटातील नेत्याकडून शिंदे गटातील आमदाराचं कौतुक

‘मन की बात’ कार्यक्रमाचे पुस्तक छापण्यावरून लुबाडले

एका डेंटिस्टचे साखरपुड्याच्या दिवशी अपहरण

महाराष्ट्रात ७५ हजार कोटींच्या प्रकल्पांची पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन

पुढे पंतप्रधान मोदींचा ताफा एम्स रुग्णालयाकडे रवाना झाला. एम्सचे औपचारीक उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते करण्यात आले आहे. एम्समध्ये पंतप्रधान मोदी यांनी पाहणी केली आहे. दरम्यान, पंतप्रधान मोदींना भेटण्यासाठी नागपूरमध्ये नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. या सर्वांना हात उंचावून पंतप्रधान मोदींनी अभिवादन केले आहे.

Exit mobile version