पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, ८ सप्टेंबरला पंतप्रधान मोदी कर्तव्यपथाचे उद्घाटन करतील आहेत. तसेच पंतप्रधान मोदी सेंट्रल व्हिस्टा पुनर्विकास प्रकल्पाचे उद्घाटन करणार आहेत. सोबतच इंडिया गेट येथे स्वातंत्र्य सेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याचे अनावरण करणार आहेत. पंतप्रधानांच्या सुरक्षेच्या दृष्टीने इंडिया गेटचे सर्व दहा रस्ते आणि राजपथ भोवतीचे रस्ते पूर्णपणे बंद करण्यात येणार आहेत.
कालच्या एनडीएमसीच्या बैठकीत राजपथचे नाव बदलून कर्तव्यपथ करण्यात आले आहे. आता इंडिया गेटवरील नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्यापासून ते राष्ट्रपती भवनापर्यंतच्या संपूर्ण परिसराला ‘कर्तव्यपथ’ असे म्हटले जाईल.
आज, ८ सेप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वात प्रथम नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याचे अनावरण करणार आहेत. त्यानंतर सेंट्रल व्हिस्टा पुनर्बांधणीची पाहणी करणार आहेत. संध्याकाळी ७ वाजता सेंट्रल व्हिस्टा येथील कामगारांना भेटणार असून, ७.३० पंतप्रधान मोदी सेंट्रल व्हिस्टाचे उद्घाटन करणार आहेत.
उद्घाटनाचा कार्यक्रम झाल्यानंतर आठ वाजता पंतप्रधान मोदींचे भाषण होणार असून, त्यासाठी ड्रोन शोचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी नेताजी सुभाषचंद्र बोस पुतळ्याच्या बांधकामाचा टाइमलॅप व्हिडिओ दाखवला जाणार आहे. कर्तव्य पथ बनवण्यावर एक फिल्म दाखवली जाईल, तसेच कर्तव्यपथला नाव देण्यात येईल.
हे ही वाचा:
निष्पाप बळी घेणाऱ्या याकुब मेमनच्या कबरीला संगमरवरी फरशी
अमरावतीमधील ‘त्या’ मुलीचा लागला शोध
अमित शहांच्या दौऱ्यावेळी तोतयागिरी करणाऱ्याच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
अमरावतीचे शिवसेना जिल्हाप्रमुख भाजपाच्या वाटेवर
सेंट्रल व्हिस्टा अव्हेन्यू विजय चौक ते इंडिया गेट पर्यंत ३.२ किमी पसरलेले आहे. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी वीस हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. यामध्ये राज्यनिहाय खाद्यपदार्थांचे स्टॉल, लाल ग्रॅनाइट स्टोनचे सर्वत्र हिरवेगार रस्ते, वेंडिंग झोन, पार्किंग लॉट्स आणि चोवीस तास सुरक्षा असणार आहे. पुढील वीस महिन्यानंतर ते सर्वसामान्यांसाठी खुले केले जाणार आहेत.