उत्तर प्रदेशच्या विधान परिषदेत कालचा दिवस इतिहासातील महत्त्वाचा दिवस ठरला. कारण बुधवार, ६ जुलै रोजी काँग्रेसचे एकमेव विधीमंडळातील सदस्य निवृत्त झाले असून उत्तर प्रदेश विधान परिषद आता काँग्रेसमुक्त झाली आहे. १९३५ नंतर देशात पहिल्यांदाच असे घडले आहे. राज्य विधिमंडळाच्या या वरिष्ठ सभागृहाचे एकमेव सदस्य दीपक सिंह निवृत्त झाले आहेत.
उत्तर प्रदेश विधान परिषदेचे नऊ सदस्य निवृत्त झाले. त्यामध्ये सहा समाजवादी पक्षाचे, तीन बसपचे, एक काँग्रेसचे आणि दोन भाजपाचे आहेत. भाजपाचे दोन सदस्य, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि पंचायत राज मंत्री चौधरी भूपेंद्र सिंह यांनी पुन्हा विधानपरिषद निवडणुकीत विजय मिळवून सभागृहाचे सदस्य बनले आहेत.
हे ही वाचा:
एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारला
पोलिसांनी तेलंगातील तीन पीएफआय कार्यकर्त्यांना केली अटक
उद्धव ठाकरेंना भेटायला आलेल्या शिवसैनिकाचा ह्रदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू
पवईतील हिरानंदानी मॉलमध्ये भीषण आग
उत्तर प्रदेशात काँग्रेसचा पडता काळ १९८९ मध्ये सुरु झाला. नारायण दत्त तिवारी हे काँग्रेसचे शेवटचे मुख्यमंत्री होते. त्यांच्या पाठोपाठ मुलायमसिंह यादव यांचे सपाचे सरकार आणि राज्यात काँग्रेसमुक्त सरकारे उदयास आली. त्यानंतर विधानपरिषदेतील काँग्रेस सदस्यांची संख्याही झपाट्याने घटली. २०१२ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे फक्त २८ आमदार निवडून आले होते. त्यानंतर २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत फक्त ७ आमदार निवडून आले आणि २०२२ मध्ये केवळ २ आमदार निवडून आले.