30 C
Mumbai
Saturday, December 28, 2024
घरराजकारणमोदींच्या तिसऱ्या पर्वात एक-दोन वर्षांत नक्षलवादाचा नायनाट करू

मोदींच्या तिसऱ्या पर्वात एक-दोन वर्षांत नक्षलवादाचा नायनाट करू

अमित शहा यांचे आश्वासन

Google News Follow

Related

‘काँग्रेसच्या राजवटीत नक्षलवाद देशाच्या एक तृतीयांश भागात होता. तथापि, एनडीएच्या १० वर्षांच्या राजवटीत नक्षलवाद केवळ छत्तीसगडमधील चार जिल्ह्यांपुरता मर्यादित आहे. मतदारांनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आशीर्वाद दिल्यास त्यांचे सरकार एक ते दोन वर्षांत देशातून नक्षलवादाचे समूळ उच्चाटन करेल,’ असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटले आहे.

इंडिया टुडे टीव्हीशी बोलताना अमित शाह यांनी छत्तीसगडच्या कांकेर जिल्ह्यात सुरक्षा दलाने नुकत्याच केलेल्या कारवाईबद्दल सांगितले. या कारवाईत २९ नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. ‘मंगळवारी केलेल्या कारवाईत, सीमा सुरक्षा दल आणि जिल्हा राखीव दलाच्या पथकांनी कांकेरमध्ये संयुक्त कारवाई केली, ज्यात नक्षलवाद्याच्या म्होरक्यासह २९ नक्षलवादी ठार झाले. डाव्या विचारसरणीच्या दहशतवादाविरुद्ध छत्तीसगडच्या इतिहासात एकाच चकमकीत ठार झालेल्या नक्षलवाद्यांची ही सर्वांत मोठी संख्या आहे. छत्तीसगडमध्ये भाजपने सरकार बनवताच नक्षलवादावरील कारवाई तीव्र झाली,’ असे गृहमंत्र्यांनी सांगितले.

‘नक्षलवाद आता केवळ छत्तीसगडमधील चार जिल्ह्यांपुरता मर्यादित आहे. पाच वर्षे राज्यातील काँग्रेस सरकारने आम्हाला योग्य सहकार्य केले नाही. सरकार बदलले आणि प्राधान्यक्रम बदलला आणि ९० दिवसांत आम्ही ८६ नक्षलवाद्यांचा खात्मा केला. १२६ जणांना अटक केली. तसेच, २५०हून अधिक लोकांनी आत्मसमर्पण केले,’ असे अमित शाह म्हणाले.

‘मी विश्वासाने सांगू शकतो की जर जनतेने पंतप्रधान मोदींना तिसऱ्यांदा निवडून दिले तर आम्ही एक-दोन वर्षांत या देशातून नक्षलवादाचा निःपात करू,’ असे शहा म्हणाले. कांकेरमधील सुरक्षा मोहिमेची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या काँग्रेसवरही गृहमंत्र्यांनी टीका केली. ‘त्यांना प्रत्येक गोष्टीत काहीतरी संशयास्पद वाटते. तुलसीदासजींनी रामचरितमानसमध्ये म्हटले आहे की जेव्हा देव एखाद्याला शिक्षा करण्याचा निर्णय घेतो तेव्हा ते एखाद्या व्यक्तीची विवेकबुद्धी हिरावून घेतो. मला असे वाटते की त्यांनी (काँग्रेस) त्यांची विवेकबुद्धी गमावली आहे,’ अशी टीका शहा यांनी केली.

हे ही वाचा:

पट्टा-काठीने मारहाण, तोंडात फेव्हीकॉल, जखमांवर मीठ…महिलेवर अत्याचार, लव्ह जिहादचा संशय

इराणने जप्त केलेल्या इस्रायली जहाजावरील भारतीय डेक कॅडेट सुखरूप परतली मायदेशी

पक्षांना निधी पुरवठा करण्यासाठी राष्ट्रीय निधीचा पर्याय

भगवी वस्त्रे परिधान केल्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला, शाळेच्या मुख्याध्यापकांवर गुन्हा

बुधवारी काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनाते यांनी या चकमकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत या घटनेची चौकशी व्हायला हवी, असे सांगितले. ‘काँग्रेसच्या राजवटीत देशाच्या एक तृतीयांश भागात नक्षलवादाचे अस्तित्व होते. मोदी सरकारच्या १० वर्षांत आम्ही नक्षलग्रस्त भागात २५० सुरक्षा छावण्या उभारल्या आहेत. आज मी आत्मविश्वासाने सांगू शकतो की झारखंड, बिहार, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश ही राज्ये नक्षलवादापासून पूर्णपणे मुक्त झाली आहेत,’ असा विश्वास शहा यांनी व्यक्त केला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा