लटके आघाडीवर आणि नोटा दुसऱ्या क्रमांकावर

अपक्ष उमेदवारांपेक्षाही जास्त मतं नोटाला मिळाली आहेत.

लटके आघाडीवर आणि नोटा दुसऱ्या क्रमांकावर

अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीचा आज निकाल असून, सर्वांचं लक्ष त्या निकालाकडे लागलं आहे. या निवडणुकीला फक्त ३१.७४ टक्के मतदान झाले होते. दरम्यान, या निवडणुकीची मतमोजणी सुरु असून, पहिली, दुसरी आणि तिसरी फेरी पूर्ण झाली आहे. या फेरीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षच्या ऋतुजा लटके आघाडीवर आहेत. मात्र, मतदारांनी नोटालाही प्राधान्य दिलं असल्याचे मतमोजणीत दिसून येतं आहे. अपक्ष उमेदवारांपेक्षाही जास्त मतं नोटाला मिळाली आहेत.

ऋतुजा लटके यांना पहिल्या फेरीत चार हजार २७७ मतं पडली आहेत. तर दुसऱ्या फेरीत सात हजार ८१७ मतं आणि तिसऱ्या फेरीत ११ हजार ३६१ मतांनी मतं पडली असून, एकूण त्यांना २३ हजार ४५५ मतं आहेत. तर नोटाला पहिल्या फेरीत ६२२ मतं आणि दुसऱ्या फेरीत एक हजार ४७० मतं आणि तिसऱ्या फेरीत दोन हजार ९६७ मतं आहेत. नोटाला एकूण पाच हजार ५९ मतं मिळाली आहेत. तसेच सात अपक्ष उमेदवार रिंगणात होते. अपक्ष उमेदवार मनोज नाईक यांना ५७, मिलिंद कांबळे यांना ७९, राजेश त्रिपाठी यांना १२७, फरहान सय्यद १०३, नीता खेडकर १३८ आणि अपनी पार्टीचे बाळा नाडार यांना २२२ मतं पहिल्या फेरीत मिळाली आहेत. तर बाळा नाडर यांना दुसऱ्या फेरीत ३३९ आणि तिसऱ्या फेरीत ४३२ मतं मिळाली आहेत. परंतु, या निवडणुकीत नोटाला दुसऱ्या क्रमांकाचं प्राधान्य मिळत आहे.

हे ही वाचा:

श्रीलंकेचा फलंदाज दानुष्काला बलात्काराच्या आरोपात अटक

हाऊसकिपिंग करणाऱ्यानेच घर ‘साफ’ केले, २४ तासांत जेरबंद

नितेश राणेंचा मोर्चा आणि त्याच रात्री लागला मुलीचा शोध

संभाजी भिडेंनी पत्रकाराला सांगितले, आधी टिकली लाव मगचं बोलू

या मतदार संघात निवडणूक जाहीर झाल्यापासून अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत. अखेरच्या क्षणी भाजप उमेदवार मुरजी पटेल यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. मतदानाच्या वेळही फक्त ३१.७४ टक्के मतदान झाले होते. मतदारांनी ऋतुजा लटके यांना पहिले प्राधान्य दिले असले तरी नोटाला दुसऱ्या क्रमांकाचे प्राधान्य दिले आहे. दरम्यान, मतमोजणी सुरु आहे.

Exit mobile version