आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा सध्या कारागृहात आहेत. त्यात आज, २८ एप्रिल रोजी आमदार रवी राणा यांचा वाढदिवस आहे. कारागृहात असल्याने ते त्यांच्या वाढदिवसाला हजर राहू शकलेले नाहीत. मात्र, तरीही त्यांच्या युवा स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आणि त्यांच्या कुटंबाने अमरावतीमध्ये वाढदिवस जल्लोषात साजरा केला आहे.
रवी राणा यांचा वाढदिवस त्यांच्या अनुपस्थितीत त्यांच्या गंगा सावित्री निवासस्थानी साजरा केला. यावेळी वी राणा यांची उपस्थिती नसल्याने त्यांच्या मातोश्री सावित्री राणा यांना अश्रू अनावर झाले होते. यावेळी रवी राणा यांचे मोठे बंधू सुनील राणा यांचा चिरंजीवाने केक कापून वाढदिवस साजरा केला. त्यांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या जल्लोषात वाढदिवस साजरा केला आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी राणांच्या निवासस्थानी एक हजार दिवे लावले होते. भव्य रांगोळी काढली होती. ही सजावट करताना राणा दाम्पत्यांची मुले आणि आई वडील देखील सहभागी झाले होते.
हे ही वाचा:
काय अर्थ आहे शनीच्या कुंभ राशीप्रवेशाचा ?
योगींच्या आदेशावरून ११ हजार धार्मिक स्थळांवरील भोंगे उतरवले
‘संजय राऊत लकडावाला यांच्या रिसॉर्टमध्ये राहायचे’
यावेळी माध्यमांनी राणांच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. ते म्हणाले, दरवर्षी रवी राणांचा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरी केला जातो. या दिवशी वेगवेगळे उपक्रम अमरावतीत राबवले जातात. गरीब, अपंगांना या दिवशी मदत केली जाते. मात्र यावेळी राणा मच्यासोबत नाहीत, या दडपशाही सरकारने त्यांना कारागृहात टाकले आहे. तसेच दरवर्षी रवी रानाचा वाढदिवस आम्ही जनसेवा दिवस म्हणून साजरा करतो. त्याप्रमाणे आम्हीसुद्धा भोजनवाटप आणि गोरगरिबांना मदतीचा हात पुढे करणार असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले.