सिंगापूरमध्ये पंतप्रधान मोदींनी लुटला ढोल वाजवण्याचा आनंद!

सिंगापूरमध्ये नरेंद्र मोदींचे जल्लोषात स्वागत

सिंगापूरमध्ये पंतप्रधान मोदींनी लुटला ढोल वाजवण्याचा आनंद!

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ब्रुनेई दौऱ्यानंतर बुधवारी दोन दिवसांच्या सिंगापूर दौऱ्यासाठी सिंगापूरमध्ये दाखल झाले आहेत. यावेळी तेथील भारतीय समुदायाने त्यांचे मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात स्वागत केले. ढोल- ताशांच्या गजरात त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही तेथील नागरिकांच्या जल्लोषात सहभाग घेतल्याचे पाहायला मिळाले. स्वागतासाठी ढोल वाजत असताना त्यात सहभागी होण्यासाठी नरेंद्र मोदी स्वतःला थांबवू शकले नाहीत आणि त्यांनी तिथे ढोल वाजवण्याचा आनंदही लुटला.

ब्रुनेई दौऱ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सिंगापूरला भेट दिली. यावेळी मोठ्या संख्येने भारतीय समुदायाची लोक तोठे मोदींच्या स्वागतासाठी जमली होती. ढोल- ताशांच्या तालावर लोक नाचत होते. यावेळी नरेंद्र मोदींनी स्वतः ढोल वाजवण्याचा आनंद लुटला. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल झाला आहे.

सिंगापूरमधील हॉटेलच्या बाहेरही भारतीय समुदायाचे लोक त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते. लोकांनी नरेंद्र मोदींसोबत सेल्फी काढले. त्यांना अभिवादन केले. शिवाय ‘रामचंद्र की जय’ आणि ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोषही केला. एका महिलेने नरेंद्र मोदींना राखी बांधली. तर, काहींनी मोदींना भगव्या रंगाची शालही भेट म्हणून दिली. नरेंद्र मोदींची एक झलक पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केल्याचे चित्र सिंगापूरमध्ये होते.

हे ही वाचा..

पॅरालिम्पिकमध्ये २१ वे पदक; महाराष्ट्राचा सुपुत्र सचिन खिलारीला गोळा फेकमध्ये रौप्य

टेक्सासमध्ये भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू

कंदाहार अपहरणावरील वेबसीरिजमध्ये दिसणार इस्लामी अतिरेक्यांची खरी नावे

…तर छत्रपतींचा पुतळा पडला नसता !

दक्षिण पूर्व आशियाई देशासोबत भारताची धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बुधवारी दोन दिवसांच्या सिंगापूर दौऱ्यावर पोहोचले आहेत. ब्रुनेईचा पहिला द्विपक्षीय दौरा आटोपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांचे सिंगापूरचे समकक्ष लॉरेन्स वोंग यांच्या निमंत्रणावरून सिंगापूरला आले आहेत. गुरुवारी संसद भवनात पंतप्रधान मोदींचे अधिकृत स्वागत करण्यात येणार आहे.

सिंगापूरला रवाना होण्यापूर्वी जारी केलेल्या निवेदनात नरेंद्र मोदी म्हणाले होते की, सिंगापूरसोबतची धोरणात्मक भागीदारी, विशेषतः प्रगत उत्पादन, डिजिटलायझेशन आणि शाश्वत विकासाच्या नवीन आणि उदयोन्मुख क्षेत्रांमध्ये चर्चा करण्यासाठी उत्सुक आहे. यापूर्वी २०१८ साली पंतप्रधान मोदींनी सिंगापूरला भेट दिली होती.

Exit mobile version