31 C
Mumbai
Sunday, March 23, 2025
घरराजकारणउरी, पुलवामा हल्ल्याचा बदला घेऊन पंतप्रधान मोदींनी भारताला इस्रायल, अमेरिकेच्या यादीत आणले

उरी, पुलवामा हल्ल्याचा बदला घेऊन पंतप्रधान मोदींनी भारताला इस्रायल, अमेरिकेच्या यादीत आणले

राज्यसभेत गृहमंत्री अमित शाह यांचे दहशतवादावर वक्तव्य

Google News Follow

Related

गृह मंत्रालयाच्या कामकाजावरील चर्चेदरम्यान राज्यसभेत बोलताना गृहमंत्री अमित शाह यांनी काश्मीर मुद्द्यावर भाष्य केले. उरी आणि पुलवामा हल्ल्यांचा उल्लेख करताना अमित शहा म्हणाले की, आम्ही १० दिवसांत या हल्ल्यांचा बदला घेतला. भारताला इस्रायल आणि अमेरिकेच्या यादीत आणले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले की, कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवाद्यांशी भारतीय तरुणांचा संबंध जवळजवळ नाहीसा झाला आहे.

अमित शहा यांनी आपल्या भाषणाची सुरुवात हुतात्मा सैनिकांना श्रद्धांजली अर्पण करून केली. ते म्हणाले की, देशाच्या सीमा सुरक्षित करण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या केंद्रीय दलांच्या आणि राज्य पोलिसांच्या हजारो सैनिकांना सलाम करतो. गृह मंत्रालय अतिशय कठीण परिस्थितीत काम करते. कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी राज्यांची आहे आणि सीमा सुरक्षा ही गृह मंत्रालयाची जबाबदारी आहे. पुढे अमित शाह म्हणाले की, पंतप्रधान मोदी सत्तेत आल्यानंतर उरी आणि पुलवामा येथे दहशतवादी हल्ले झाले. मात्र, १० दिवसांतच भारताने पाकिस्तानमध्ये सर्जिकल स्ट्राईक आणि हवाई हल्ले करून योग्य प्रत्युत्तर दिले. अमेरिका आणि इस्रायल हे फक्त दोन देश त्यांच्या सुरक्षेसाठी आणि सीमांसाठी उभे राहायचे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या यादीत भारताचा समावेश केला आहे.

नरेंद्र मोदी सरकारच्या दहशतवादाविरुद्धच्या कठोर भूमिकेवर भाष्य करताना अमित शाह म्हणाले की, जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवादाच्या घटनांमध्ये लक्षणीय घट झाली आहे. २००४ ते २०१४ दरम्यान या प्रदेशात ७,२१७ दहशतवादी घटना घडल्या, तर २०१४ ते २०२४ दरम्यान ही संख्या २,२४२ पर्यंत घसरली. मोदी सरकारच्या काळात दहशतवादामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये ७० टक्के घट झाल्याचेही त्यांनी म्हटले.

यासोबतच पूर्वीच्या युपीए सरकारवरही त्यांनी निशाणा साधला. अमित शाह म्हणाले की, दहा वर्षांपूर्वी, दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रा काढणे सामान्य होते आणि लोक त्यांचा गौरव करायचे. पण आता, जेव्हा दहशतवादी मारले जातात तेव्हा त्यांना जागीच दफन केले जाते. मोदी सरकार दहशतवादाविरुद्ध शून्य-सहिष्णुता धोरण पाळते, पूर्वी दहशतवादी हल्ल्यांनंतर कोणतीही ठोस कारवाई केली गेली नव्हती, अशी टीका त्यांनी केली.

२०१९ मध्ये कलम ३७० रद्द करून मोदी सरकारने भारताच्या संविधानकर्त्यांचे स्वप्न पूर्ण केले. देशात फक्त एकच पंतप्रधान, एक संविधान आणि एकच ध्वज असू शकतो, असं अमित शाह म्हणाले. तसेच अमित शहा यांनी २०२४ च्या जम्मू आणि काश्मीर निवडणुका शांततेत पार पडल्याबद्दलही कौतुक केले. एकही गोळी झाडली गेली नाही आणि बूथवर गोंधळाची तक्रार नव्हती.

हे ही वाचा  : 

आयपीएल २०२५ : केकेआर आणि आरसीबीचा उद्घाटन सामना रद्द होणार?

विधारा: एक चमत्कारी औषध, अनेक आजारांवर प्रभावी

मायग्रेनपासून मुक्ती देणारे ‘स्वर्गीय झाड’

चेन्नई सुपर किंग्सची ताकद, कमजोरी आणि रणनीती

काश्मीरमध्ये पर्यटनाला चालना देण्यात आली. तेथील बंद असलेली चित्रपटगृहे उघडण्यात आली. गेल्या १० वर्षांत सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत झाली आहे. सुरक्षा दलांचा आत्मविश्वास वाढवला आहे. काश्मीरमधील सुरक्षा आणि स्थिरतेमुळे सामान्य जीवन पुन्हा सुरू झाले आहे. G20 बैठकही यशस्वीरित्या पार पडली आणि अनेक दशकांपासून बंदी असलेली मोहरम मिरवणूकही झाली, असं अमित शाह म्हणले.

जम्मू आणि काश्मीरमध्ये रोजगार आणि औद्योगिक गुंतवणूक वाढवण्यासाठी मोदी सरकारच्या प्रयत्नांवरही अमित शाह यांनी भाष्य केले. २०१९ ते २०२४ पर्यंत ४०,००० सरकारी नोकऱ्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत आणि १.५१ लाख स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करण्यात आल्या आहेत. तरुणांना प्रशिक्षित करण्यासाठी कौशल्य क्लब स्थापन करण्यात आले आहेत. आकर्षक औद्योगिक धोरणामुळे जम्मू आणि काश्मीरमध्ये १२,००० कोटी रुपयांची गुंतवणूक आधीच प्रत्यक्षात आली आहे, तर १.१ लाख कोटी रुपयांचे सामंजस्य करार (एमओयू) झाले आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
237,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा