अनेक राज्यांत ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपट करमुक्त!

अनेक राज्यांत ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपट करमुक्त!

जम्मू-काश्मीरवर बनलेल्या ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाला देशातून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रेक्षकांचा पाठिंबा पाहता अनेक भाजपशासित राज्यांमध्ये ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपट करमुक्त करण्यात आला आहे. या चित्रपटात अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, दर्शन कुमार आणि पल्लवी जोशी यांच्या प्रमुख भूमिका असून त्यांच्या अभिनयाचेही कौतुक होत आहे.

गुजरात, हरियाणा, कर्नाटक,मध्य प्रदेश आणि गोवा या भाजपशासित राज्यांमध्ये ‘द काश्मीर फाइल्स’ करमुक्त करण्यात आला आहे. यासोबतच त्रिपुरा आणि उत्तराखंडमध्येही हा चित्रपट करमुक्त करण्यात आला आहे. त्याचवेळी काल उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही युपीमध्ये हा चित्रपट करमुक्त करण्याचे निर्देश जारी केले आहेत. तर राजस्थानमध्ये भाजपासोबत काँग्रेसचे आमदारही चित्रपट करमुक्त करण्याची मागणी करत आहेत.

मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी डीजीपींना चित्रपट पाहण्यासाठी पोलिसांना एक दिवसाची सुट्टी देण्यास सांगितले आहे. मिश्रा यांनी म्हटले आहे की, “जेव्हा पोलिसांना सोयीनुसार कुटुंबासह चित्रपट पाहण्यासाठी जायचे असेल, तेव्हा त्यांची रजा मंजूर करण्यात यावी.” तीन दिवसांत या चित्रपटाच्या कमाईत ३२५ टक्के वाढ झाली आहे. तसेच चित्रपटाच्या स्क्रीनची संख्याही ६०० वरून २ हजार करण्यात आली आहे.

हे ही वाचा:

चित्रपटगृहांमध्ये धुमाकूळ घालणारा ‘द काश्मीर फाइल्स’ लवकरच या ओटीटी प्लॅटफॉर्मवर

डहाणू महोत्सवाने दिला स्थानिकांना आर्थिक हातभार

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला!

फडणवीसांनी फोडला दुसरा बॉम्ब! ‘न्यूज डंका’ च्या हाती एक्सक्ल्युझिव्ह ध्वनिफीत

या चित्रपटाचे पंतप्रधान मोदींनीही कौतुक केले आहे. चित्रपटाचे निर्माते अभिषेक अग्रवाल यांनी ट्विटरवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये पंतप्रधान मोदी निर्माते अभिषेक यांचे कौतुकच करताना दिसत आहेत. ट्विटमध्ये फोटो शेअर करून अभिषेक यांनी, ” पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून आनंद झाला. ‘द कश्मीर फाइल्स’ बद्दल त्यांनी खूप स्तुती केली आहे.” असे ट्विट त्यांनी केले आहे.

Exit mobile version