…. असे आहे पंतप्रधान मोदींचे भगवान बुद्धांशी नाते

…. असे आहे पंतप्रधान मोदींचे भगवान बुद्धांशी नाते

पंतप्रधान नरेंद्र मोदी एका दिवसाच्या नेपाळ दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी नेपाळच्या जनतेशी संवाद साधत नेपाळच्या जनतेला बौद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. गौतम बुद्धांचे जन्मस्थान असलेल्या ठिकाणी म्हणजेच लुंबिनीमध्ये पंतप्रधान मोदींनी जनतेला संबोधित केले आहे.

यावेळी पंतप्रधान मोदींनी नेपाळच्या जनतेशी संवाद साधताना नेपाळी भाषेत सुरुवात केली. नेपाळला बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा देत ते म्हणाले, प्रभू राम देखील नेपाळशिवाय अपूर्ण आहेत. आज भारतात राम मंदिर बांधले जात असले तरी नेपाळच्या लोकांनाही आनंद झाला आहे. भारत आणि नेपाळ यांच्यातील जवळीक संपूर्ण मानवतेचे हित साधत आहे.

पुढे पंतप्रधान मोदी म्हणाले, महात्मा गौतम बुद्ध हे ज्ञानी होते, त्यांनी केवळ उपदेशच केला नाही तर मानवतेला एक वेगळीच शिकवण दिली. गौतम बुद्ध हे सामान्य मूल म्हणून जन्माला आले नव्हते. प्राप्तीपेक्षा त्याग महत्त्वाचा आहे, याची जाणीव त्यांनी जगाला करून दिली. म्हणून त्यांनी जंगलात भटकंती केली, तपश्चर्या केली आणि संशोधन केले. त्या आत्मनिरीक्षणानंतर, जेव्हा ते ज्ञानाच्या शिखरावर पोहोचले, तेव्हा त्यांनी कधीही कोणत्याही चमत्काराने लोकांच्या कल्याणाची शिकवण दिली नाही तर ते जे स्वतः ज्या मार्गाने जगले होते तो मार्ग त्यांनी लोकांना सांगितला.

महात्मा बुद्धांचा जन्म पौर्णिमेच्या दिवशी झाला आणि या दिवशी त्यांना बोधगया येथे ज्ञानप्राप्ती झाली आणि त्यानंतर या तारखेला त्यांना निर्वाण मिळाले. तो निव्वळ योगायोग नव्हता. ही मानवी जीवनाची परिपूर्णता आहे. पौर्णिमा हे परिपूर्णतेचे प्रतीक आहे, असंही पंतप्रधान मोदी म्हणले.

हे ही वाचा:

अमृता फडणवीस म्हणाल्या, वजनदार ने हलके को…

दहशतवादी संघटनेकडून काश्मिरी पंडितांना धमकीचे पत्र

फडणवीसांनी ठोकले!

होय, मुंबई वेगळी करायची आहे, पण तुमच्या भ्रष्टाचारापासून!

भगवान बुद्धांशी माझे नाते असल्याचे म्हणत पंतप्रधान मोदी म्हणाले, भगवान बुद्धांशी माझेही नाते आहे. यातही एक अद्भुत आणि आनंदी योगायोग आहे. वडनगर, जिथे माझा जन्म झाला, ते प्राचीन काळात बौद्ध शिक्षणाचे प्रमुख केंद्र होते. तिथून अजूनही मोठे अवशेष बाहेर पडत आहेत. भारतात अशी अनेक शहरे आहेत, जिथे लोक त्यांना त्या राज्याची काशी म्हणून ओळखतात. काशीजवळील सारनाथशी असलेले माझे नाते तुम्हालाही माहीत आहे. हा वारसा आपल्याला मिळून समृद्ध करायचा आहे. नेपाळ आणि भारताचे नाते हिमालयासारखे जुने आणि अतूट आहे. आता त्या नात्याला अजून मजबूत करायचे असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.

Exit mobile version