पारनेर तहसीलदार ज्योती देवरे यांनी ऑडिओ क्लिप तयार करून आत्महत्येचा इशारा दिल्यानंतर या प्रकरणाची चौकशी होऊन समाजकंटकांवर कारवाई व्हायला हवी अशी मागणी केली जात आहे.
तहसीलदार यांनी ऑडिओ क्लिप व्हायरल केल्यामुळे जिल्ह्यात चर्चेला चांगलेच उधाण आलेले आहे. त्यामुळेच आता समाजकंटाकांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने राज्यसरकारकडे निवेदनाद्वारे केलेली आहे.
या क्लिपमुळे पारनेरसह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. क्लिपमध्ये महिला अधिकारी म्हणून काम करताना नोकरीत होणारा त्रास तसेच वरिष्ठांचे दुर्लक्ष या बाबत सविस्तर कथन ऑडिओ क्लिप मध्ये केले आहे. इतकंच नाही तर लोकप्रतिनिधीकडून होणारा त्रास देखील त्यांनी सांगितला आहे. जिल्ह्यात चर्चांना उधाण आले आहे. या क्लिपमध्ये महिला अधिकारी म्हणून होणारा त्रास, वरिष्ठांकडून केले जाणारे दुर्लक्ष, नोकरीत येताना केलेला निर्धार आणि प्रत्यक्षात झालेली निराशा अशा अनेक गोष्टींवर सविस्तर कथन केलेले आहे.
याच महासंघाने वर्षभरापूर्वी देखील ज्योती देवरे यांच्यासंदर्भात समाजकंटकांच्या विरोधात योग्य कारवाई करण्यात यावी अशी मागणी केलेली होती. परंतु राजकीय नेतृत्व तसेच प्रशासनाने मात्र याकडे दुर्लक्ष केलेले आहे. त्यामुळेच आता ध्वनीफीतीच्या माध्यमातून देवरे यांचा हताशपणा उघडपणे समोर आलेला आहे.
हे ही वाचा:
मनसुख हिरेन नंतर कळवा खाडीत सापडला आणखीन एका उद्योजकाचा मृतदेह
‘रेशमाच्या रेघांनी’वर थिरकले राष्ट्रवादीचे गॅसदरवाढीचे आंदोलन
भोलानाथ भोलानाथ, शाळा भरेल काय?
व्हायला हवी पवारांच्या जातवादी राजकारणाची चर्चा
भाजपच्या चित्रा वाघ यांनी यासंदर्भात सरकारला चांगलेच फैलावर घेतले आहे. चित्रा वाघ म्हणाल्या, “पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांची ऑडीयो क्लीप ऐकली आणि मन सुन्न झालं. सत्तेतले हे बेलगाम घोडे. देवमाणूस म्हणून मिरवणाऱ्या पारनेरच्या या लोकप्रतिनिधींच्या नाकात वेसणं घालायचं काम महिला सशक्तीकरणाच्या बाता मारणाऱ्यांकडून होतंय का तेचं आता पहायचंय.” देवरे यांना धमकवणारे समाजकंटक यांच्याविरोधात कठोर कायदेशीर कारवाई करून त्यांना व त्यांच्या कुटूंबियांना तातडीने सुरक्षा पुरविण्यात यावी अशी विनंती आता महासंघाचे संस्थआपक ग. दि. कुलथे, अध्यक्ष विनोद देसाई यांनी केली आहे. तसेच दुर्गा महिला मंचच्या अध्यक्षा सोनाली कदम यांनी मुख्यमंत्र्याकडे संबंधित विषयावर योग्य कारवाई करावी अशी मागणी केलेली आहे.