इराकमध्येही श्रीलंकेसारखी परिस्थिती; नागरीक संसदेत घुसले

इराकमध्येही श्रीलंकेसारखी परिस्थिती; नागरीक संसदेत घुसले

श्रीलंकेप्रमाणे आता इराकमध्येसुद्धा आंदोलन सुरू आहे. बुधवारी शेकडो संतप्त निदर्शकांनी इराकची राजधानी असलेल्या बगदादमधील संसद भवनावर कब्जा केला आहे. पंतप्रधानपदाचे उमेदवार मोहम्मद शिया अल-सुदानी यांच्या विरोधात ही निदर्शनं होत आहेत. बहुतेक आंदोलक शिया नेते मुक्तदा अल-सदर यांचे समर्थक आहेत. अल-सुदानी हे माजी मंत्री आणि माजी प्रांतीय गव्हर्नर आहेत.

सरकारी इमारती आणि राजनैतिक मिशनचे घर असलेल्या बगदादच्या उच्च सुरक्षा ग्रीन झोनमध्ये बुधवारी आंदोलकांनी प्रवेश केला. त्यानंतर ते संसदेत गेले. संसद भवनात आंदोलकांनी प्रवेश केल्यानंतर आंदोलकांनी भवनात नाच गाणं केलं. संसदेच्या स्पीकरच्या डेस्कवर तर एक व्यक्ती चक्क झोपला होता. तसेच आंदोलक संसद भवनात फोटो देखील काढत बसले होते. विरोधकांनी संसद भवनात प्रवेश केला, तेव्हा एकही खासदार तिथं उपस्थित नव्हता. संसदेत सुरक्षा दलं उपस्थित असतानाही त्यांनी आंदोलकांना रोखलं नाही.

हे ही वाचा:

शिंदे-फडणवीस सरकार येताच बुलेट ट्रेन फास्ट ट्रॅकवर

अर्पिता मुखर्जी यांच्या घरातून आतापर्यंत मिळाले ५० कोटी

औरंगाबादचे संभाजीनगर नामकरण नको; उच्च न्यायालयात १ ऑगस्टला सुनावणी

मनी लॉन्डरिंग कायद्यातील तरतुदींना सर्वोच्च दिलासा; ईडीविरोधातील सुनावणी

बहुतांश निदर्शक हे इराकी शिया नेते मुक्तदा अल-सद्र यांचे समर्थक आहेत. माजी मंत्री आणि माजी प्रांतीय गव्हर्नर मोहम्मद शिया अल- सुदानी यांना इराण समर्थित पक्षाने पंतप्रधानपदासाठी उमेदवारी दिल्याचा निषेध करत आहेत. पंतप्रधान मुस्तफा अल-कादिमीयांनी आंदोलकांना इशारा दिला आहे. त्यांनी आंदोलकांना तातडीनं ग्रीन झोन सोडण्यास सांगितलंय आहे. ग्रीन झोनमध्ये सरकारी इमारती आणि राजनैतिक मिशनची घरं आहेत.

Exit mobile version