इंदूरमध्ये मतदारांची भाजपानंतर ‘नोटा’ला पसंती

इंदूरमध्ये मतदारांची भाजपानंतर ‘नोटा’ला पसंती

मध्य प्रदेशमधील इंदूरची निवडणूक संपूर्ण देशात चर्चेचा विषय बनली आहे. इंदूरमध्ये भाजपा उमेदवार आणि नोटा (NOTA) यांच्यात लढत सुरू आहे. इंदूरमधील भाजपाचे उमेदवार शंकर लालवानी हे देशातील सर्वात मोठ्या विजयाकडे वाटचाल करत आहेत. यासह इंदूरमध्ये नोटाला सुमारे दोन लाख मते मिळाली आहेत. इंदूरच्या निकालाची देशभर चर्चा आहे.

इंदूरमध्ये काँग्रेसचे लोकसभा उमेदवार अक्षय कांती बम यांनी निवडणुकीपूर्वी उमेदवारी अर्ज मागे घेतला होता. त्यामुळे इंदूरमध्ये काँग्रेसला निवडणूक लढवता आली नाही. काँग्रेसने जनतेला ‘नोटा’वर मतदान करून निषेध नोंदवण्याचे आवाहन केले होते. मात्र, असे असतानाही निकालात भाजपाचे उमेदवार शंकर लालवानी हे ११ लाख मतांनी आघाडीवर आहेत. तर, नोटाला १,९८,६८४ मते मिळाली आहेत. यापूर्वी २०१९ मध्ये, भाजपाच्या सी आर पाटील यांनी गुजरातमधील नवसर मतदारसंघावर ६,८९,६६८ मतांनी विजय मिळवून आजपर्यंतचा सर्वात मोठा विजय मिळवला होता. त्यानंतर आता शंकर लालवानी देशातील सर्वात मोठ्या विजयाच्या वाटेवर आहेत.

दुसरीकडे, इंदूरने देशातील सर्वाधिक नोटाचा विक्रम केला आहे. येथे नोटाला एक लाखाहून अधिक मते मिळाली आहेत. शंकर लालवाणी आघाडीवर आहेत. सध्या देशात सर्वाधिक नोटा चा विक्रम बिहारच्या गोपालगंजच्या नावावर आहे. २०१९ च्या निवडणुकीत येथे ५१,६६० मते नोटाला होती.

निकालाच्या पार्श्वभूमीवर मतमोजणीचे ठिकाण असलेल्या नेहरू स्टेडियमसमोर भाजपाचे कार्यालय आहे. भाजपा कार्यालय भगव्या रंगात सजवण्यात आले आहे. भाजपचे नेते आणि कार्यकर्तेही येथे जमू लागले आहेत. इंदूरमध्ये काँग्रेसचा एकही उमेदवार रिंगणात नाही, त्यामुळे भाजपला येथे देशातील सर्वात मोठ्या विजयाची अपेक्षा आहे.

हे ही वाचा:

लैंगिक शोषणाचे आरोप असलेले प्रज्वल रेवण्णा पराभूत

अमेरिकेत आणखी एक भारतीय विद्यार्थिनी बेपत्ता!

पश्चिम बंगालमधील हिंसाचाराचा धडा!

निवडणूक आयोगाने जयराम रमेश यांनी एक आठवड्याची मागितलेली मुदत नाकारली

इंदूरच्या निवडणुकीमधून काँग्रेस आधीच बड होती. काँग्रेसचे उमेदवार अक्षय कांती बम यांनी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख २९ एप्रिल रोजी अर्ज मागे घेतला होता. त्यानंतर लगेचच त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. अक्षय कांती बम यांच्या या खेळीनंतर इंदूरच्या निवडणूक इतिहासातून काँग्रेस गायब होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

Exit mobile version