जर्मनी दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा खास स्टाइलमध्ये दिसले आहेत. पंतप्रधान मोदींचे आगमन होताच भारतीय समुदायांमध्ये असलेला उत्साह पाहण्यासारखा होता. उपस्थित लोक मोदीजी, हमारा जीवन, भारत की शान अशा घोषणा देत होते. त्यानंतर पंतप्रधान मोदी तेथे पोहोचले. त्यांनी लोकांच्या शुभेच्छा स्वीकारल्या आणि लहान मुलाशी मस्तीही केली.
#WATCH | Prime Minister Narendra Modi shared a light moment with a child in Berlin, Germany earlier today pic.twitter.com/C4dH9S8CQB
— ANI (@ANI) May 3, 2022
न्यूज एजन्सी एएनआयने पीएम मोदींच्या जर्मनी भेटीचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये पंतप्रधान मोदी एका मुलासोबत मस्ती करताना दिसत आहेत. पंतप्रधान तिथे पोहोचताच लोकांमध्ये घोषणाबाजी सुरू झाली. त्यामध्ये लोक मोदीजी, हमारा जीवन, भारत की शान अशा घोषणा देत होते. घोषणाबाजीत पंतप्रधान लोकांपर्यंत पोहोचले आणि त्यांनी लोकांचे अभिवादन स्वीकारले आणि एका लहान मुलासोबत मस्ती करताना दिसले.
जर्मनीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बर्लिन गार्ड ऑफ ऑनरनेही सन्मानित करण्यात आले होते. बर्लिनमधील पॉट्सडेमर प्लॅट्झ येथे भारतीय समुदायाच्या लोकांना संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी तरुणांचा उल्लेख केला. ते म्हणाले की, आज भारताच्या प्रगतीमागे तरुणाईचा मोठा हात आहे.
हे ही वाचा:
राहुल गांधींचा क्लबमधला व्हिडीओ व्हायरल
व्लादिमीर पुतीन यांच्यावर होणार कर्करोगाची शस्त्रक्रिया
‘राऊतांचा लेख म्हणजे आंब्याच्या झाडाला, काकडी किती लागल्यात मोजण्यासारखे’
मनसे आंदोलनामुळे पोलीस ऍक्शन मोडमध्ये
जर्मनीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात सुशासनाचे उदाहरण देताना ते म्हणाले की, देशातील जनतेपर्यंत जास्तीत जास्त लाभ पोहोचावेत यासाठी भाजपा सरकार प्रयत्नशील आहे. आज भारतातील प्रशासनात तंत्रज्ञानाचा ज्या प्रकारे समावेश केला जात आहे, त्यावरून नव्या भारताची राजकीय इच्छाशक्ती दिसून येते.