राणा दाम्पत्यांना पोलीस ठाण्यात भेटण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे नेते किरीट सोमय्या गेले होते. त्यांनतर तिथून निघाले तेव्हा त्यांच्यावर शिवसेना कार्यकर्त्यांनी हल्ला केला होता. यावेळी सोमय्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली होती, यामध्ये ते जखमी झाले होते.
सोमय्यांना जखम झाल्यानंतर त्यांनी रुग्णालयात जाण्याऐवजी त्याच ठिकाणी गाडीत ठिय्या देण्याचा निर्णय घेतला. यावेळी त्यांच्या हनुवटी जवळून रक्त येत होते, या जखमेची राजकीय वर्तुळात मोठी चर्चाही झाली होती. अखेर सोमय्यांच्या या जखमेचा रुग्णालयाचा अहवाल आला आहे.
किरीट सोमय्या यांची तपासणी केल्यानंतर भाभा हॉस्पिटलने मुंबई पोलिसांना अहवाल सादर केला आहे. या अहवालात असे म्हटले आहे की, सोमय्या यांची जखम ०.१ सेमीची कट आहे. जखमेमुळे त्यांच्या चेहऱ्याला कोणतीही सूज आलेली नव्हती. तसेच जखमेचा मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झालेला नाही. या हल्ल्यात सोमय्यांना जराही गंभीर इजा नाही अस भाभा हॉस्पिटलच्या डॉक्टरानी म्हटले आहे. हे सर्व अवाहलात नमूद केले आहे.
हे ही वाचा:
वकील गुणरत्न सदावर्तेंना जामिन! अटकेपासूनही संरक्षण
हा विजय एसटी कर्मचाऱ्यांचा आणि कष्टकऱ्यांचा
रथ ओढताना विजेचा धक्का लागून ११ भाविकांचा मृत्यू
राज्यमंत्री बच्चू कडू यांच्यावर या प्रकरणी गुन्हा दाखल होणार
राणा दाम्पत्यांना खार पोलीस ठाण्यातून भेटून घरी जात असताना शिवसेना ७० ते ८० कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. दरम्यान, राणा दाम्पत्यांने मातोश्रीसमोर हनुमान चालिसा पठणाचा अट्टाहास धरल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात राज्य सरकारला आव्हान दिल्याप्रकरणी त्यांच्यावर कलम १२४ अ अंतर्गत राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यावरूनही राजकीय वातावरण तापले असून, महाविकास आघाडी सरकारला भाजपाने धारेवर धरले आहे.