बंगालमध्ये भाजपा-तृणमूलमध्ये जोरदार रस्सीखेच

बंगालमध्ये भाजपा-तृणमूलमध्ये जोरदार रस्सीखेच

संपूर्ण देशाला ढवळून काढणाऱ्या पश्चिम बंगालमधील बहुचर्चित निवडणुकीत कुणाच्या पारड्यात जनता आपल्या मतांचे दान टाकणार याविषयीचा अंदाज गुरुवारी स्पष्ट झाला. भाजपा-तृणमूल काँग्रेस यांच्यातच जोरदार रस्सीखेच असेल हे स्पष्ट झाले. या दोन पक्षांतील वादळी प्रचारांत काँग्रेस आणि डावे हे मात्र पालापाचोळ्यासारखे उडून जाणार आहेत हेदेखील स्पष्ट झाले आहे.

पश्चिम बंगालमध्ये गुरुवारी शेवटच्या टप्प्याचे मतदान पार पडल्यानंतर ज्याची प्रतीक्षा होती, त्या मतदानोत्तर कलचाचण्यांत (एक्झिट पोल) भारतीय जनता पार्टी आणि तृणमूल काँग्रेस यांच्यात बंगालची सत्ता मिळविण्यासाठी जबरदस्त चुरस असेल यावर शिक्कामोर्तब झाले आहे. गुरुवारी जाहीर झालेल्या सर्व कलचाचण्यांत भाजपा तृणमूल काँग्रेसला जोरदार टक्कर देणार हेच दिसून आले. २०१६च्या निवडणुकीत अवघ्या ३ जागा असलेल्या भाजपाला १३८ ते १४८ जागा असतील असा अंदाज रिपब्लिक टीव्ही आणि सीएनएक्सने व्यक्त केला आहे. त्यांनी तृणमूलला भाजपापेक्षा कमी जागा मिळतील असा अंदाज व्यक्त केला. तृणमूलला त्यांनी १२८ ते १३८ जागा दिल्या आहेत. बंगालमध्ये एकूण २९२ जागांसाठी निवडणूक झालेली आहे. यावरून भाजपाच बंगालमध्ये परिबोर्तन करेल, असा अंदाज रिपब्लिकने व्यक्त केला आहे. इतर कलचाचण्यांत तृणमूलला भाजपापेक्षा अधिक जागा मिळतील असा अंदाज व्यक्त केला गेला असला तरी भाजपा जोरदार मुसंडी मारणार यावर मात्र हे सगळे कल शिक्कामोर्तब करत आहेत.

कोव्हॅक्सिन आता ६०० ऐवजी ४०० रुपयांना

रेड्डीला झालेली अटक हा राज्यातील प्रत्येकाचा विजय

“भारताला मदत करणं हे आपलं कर्तव्य आहे”, प्रिन्स चार्ल्स

“भारताला मदत करणं हे आपलं कर्तव्य आहे”, प्रिन्स चार्ल्स

पी मार्कने तृणमूलला १५२-१७२ तर भाजपाला ११२-१३२ जागांचा अंदाज वर्तविला आहे. तर सीएनएनने तृणमूलला १६२ आणि भाजपाला ११५ जागांची शक्यता वर्तविली आहे. ईटीजी रिसर्चच्या मते तृणमूल १६४-१७६ आणि भाजपा १०५-११५ असे गणित मांडले आहे. काँग्रेस-डावे मात्र या सगळ्या अंदाजांत १० ते २५ यापेक्षा अधिक जागांवर येतील अशी शक्यता नाही, हेच दाखवत आहेत.

एबीपी सी व्होटरने तृणमूलला १५२-१७२ आम भाजपाला १०९-१२१ जागा मिळतील असे म्हटले आहे.

अर्थात, पुढील महिन्यात २ मे रोजी या निवडणुकांचे निकाल जाहीर होतील त्यावेळी खरे चित्र समोर येणार आहेच. २०११ला भाजपाला बंगालमध्ये एकही जागा नव्हती तर २०१६च्या निवडणुकीत त्यांनी स्वतःचे अस्तित्व दाखविण्याचा प्रयत्न केला. मात्र या निवडणुकीत भाजपाने बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना चांगलाच घाम फोडला आहे, हे स्पष्ट आहे.

इतर चार राज्यांच्याही कलचाचण्या गुरुवारी जाहीर झाल्या. त्यात अपेक्षेप्रमाणे आसाममध्ये भाजपाच मुसंडी मारणार हे स्पष्ट आहे. आसाममध्ये एबीपी सी व्होटरने भाजपाप्रणित आघाडीला ५८-७१, पी मार्कने ६२-७०, इंडिया टुडे अक्सिसने ७५-८५, रिपब्लिकने ७४-८४ अशा जागांची शक्यता दर्शविली आहे. तर काँग्रेसप्रणित आघाडीला दुसऱ्या क्रमांकावर टाकले आहे.  अर्थातच आसाममध्ये भाजपचीच सत्ता येणार हे स्पष्ट केले आहे. तामिळनाडूत द्रमुकची सत्ता येईल यावर शिक्कामोर्तब झाले आहे. पुद्दुचेरीत ३० जागांमध्ये एनडीएची सरशी होणार हे निश्चित आहे. रिपब्लिकच्या मते १६-२० तक एबीपीच्या मते १९-२३ जागांसह एनडीएच सत्तेत येईल, अशी खात्री देण्यात आली आहे. केरळमध्ये डावी आघाडीच वरचढ ठरेल हे स्पष्ट आहे.

Exit mobile version