तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यापासून त्यांचा खरा चेहरा समोर आला आहे. महिलांच्या हिताच्या, शिक्षणाच्या आणि नोकरीच्या स्वातंत्र्याच्या गप्पा मारणाऱ्या तालिबानने आता दुसऱ्यांदा अफगाणिस्तानातील महिलांचे आयुष्यच विस्कळीत केले आहे. आपल्या नवीन निर्बंधांमध्ये, तालिबान सरकारने महिलांवर आधीच अनेक निर्बंध लादले आहेत. आता ह्या तालिबान सरकारने महिलांसाठी नवा फतवा जारी केला आहे. ज्यामध्ये महिलांनी सार्वजनिक ठिकाणी जाताना बुरखा घालण्याचे आदेश दिले आहेत.
महिलांनी डोक्यापासून पायापर्यंत बुरखा घालणे आवश्यक आहे कारण ते पारंपारिक आणि आदरणीय आहे,” असे तालिबान अधिकार्यांनी काबूलमधील एका समारंभात जारी केलेल्या फर्मानमध्ये हिबतुल्लाअखुंदजादा यांनी म्हटले आहे. तालिबानने सत्ता काबीज केल्यापासून महिलांच्या जीवनावर लादण्यात आलेल्या सर्वात कठोर निर्बंधनापैकी हा एक निर्बंध आहे. नवीन आदेशानुसार, तालिबानच्या सर्वोच्च नेत्याने आदेश दिला आहे की महिलांना सार्वजनिक ठिकाणी बुरखा घालणे बंधनकारक असेल.
हे ही वाचा:
बीडच्या अविनाश साबळेने मोडला तीस वर्षे जुना राष्ट्रीय विक्रम
ठाकरेंच्या आधी पवार पोहोचले अयोध्येला! राष्ट्रवादीलाही लागले हिंदुत्वाचे वेध?
‘ठाकरे सरकार राज ठाकरेंना घाबरले’
विलेपार्लेतील एलआयसी कार्यालयाला आग
या महिन्याच्या सुरुवातीला, अफगाणिस्तानातील हेरात शहरात तालिबानी सरकारने ड्रायव्हिंग प्रशिक्षकांना महिलांना परवाने देणे थांबवण्यास सांगितले आहे. तर मुलींना शाळेत जाण्यास सुद्धा तालिबानने बंदी घातली आहे.त्याशिवाय पुरुष सोबतीशिवाय देशांतर्गत किंवा आंतरराष्ट्रीय फ्लाइटमध्ये महिला प्रवास करू शकणार नाहीत असेही तालिबान सरकारने आदेश दिले आहेत.