‘पवार साहेब, तुम्हाला आता मलिकांपेक्षा संजय राऊत जास्त जवळचे वाटू लागलेत का?’

‘पवार साहेब, तुम्हाला आता मलिकांपेक्षा संजय राऊत जास्त जवळचे वाटू लागलेत का?’

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवार, ६ एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी संजय राऊत यांच्यावर झालेली ईडी कारवाई चुकीची असल्याचे पंतप्रधानांच्या कानावर घातले. त्यानंतर संजय राऊतांच्या कारवाईनंतर इतक्या घाईने पंतप्रधानांसमोर मुद्दा उपस्थित करणाऱ्या शरद पवारांना नवाब मलिकांपेक्षा ते जास्त महत्वाचे वाटतात का? असा प्रश्न एमआयएमच नेते इम्तियाज जलील यांनी केला आहे.

राज्यातील मंत्री नवाब मलिक, अनिल देशमुख यांच्याविरोधातही ईड आणि सीबीआय या केंद्रीय तपास यंत्रणांनी कारवाई केली आहे. या नेत्यांवरील कारवाईबद्दल विचारले असता, त्यांच्याबद्दल मोदींशी आपण चर्चा केली नाही, असे शरद पवार म्हणाले. यावरूनच एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे.

“शरद पवारांनी संजय राऊत यांच्यावर झालेल्या कारवाईनंतर जेवढी घाई दाखवली तर इतकी घाई त्यांच्या पक्षाचे नवाब मलिक अटक झाल्यानंतर का दाखवली नाही?” असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. संजय राऊत हे आता तुम्हाला जास्त जवळचे वाटू लागले आहेत का? असा सवालही त्यांनी विचारला आहे. त्यंच्या मंत्र्याने काही चूक केली आहे असे वाटते का तुम्हाला असा खोचक सवालही त्यांनी विचारला आहे.

हे ही वाचा:

धक्कादायक! राज्यमंत्र्यांच्याच कॉलेजमध्ये मुलं पुस्तकात बघून लिहितायत उत्तरं

लेक्चरदरम्यान हिंदू देवतांचा अपमान करणारा प्रोफेसर निलंबित

सोमय्या पिता-पुत्रांवर गुन्हा दाखल

येवा नेपाळ आपलाच आसा

नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्या भेटीमुळे काल राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. त्यानंतर लक्षद्वीप बद्दल काही मुद्द्यांवर चर्चा केल्याचे त्यांनी सांगितले. तसेच संजय राऊत यांची मालमत्ता जप्त करण्याच्या ‘ईडी’च्या कारवाईबद्दल शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत नाराजी व्यक्त केली. राऊत यांच्याविरोधातील कारवाईचा मुद्दा मोदींच्या भेटीत उपस्थित केल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.

Exit mobile version