इम्रान खानवर आली घर भाड्याने देण्याची वेळ

इम्रान खानवर आली घर भाड्याने देण्याची वेळ

भारताला धडा शिकविण्याच्या गमजा मारणारा पाकिस्तान दिवसेंदिवस आर्थिक अडचणीच्या चिखलात रुतत चालला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचे अधिकृत निवासस्थान भाड्याने देण्याची वेळ आता त्यांच्यावर आली आहे.

दोन वर्षांपूर्वी सत्ताधारी पाकिस्तान तेहरिक ए इन्साफ या पक्षाच्या सरकारने पंतप्रधान इम्रान यांचे इस्लामाबाद येथील अधिकृत घर विद्यापीठात रूपांतरित कऱण्याचे ठरविले होते. पण आता ती योजना गुंडाळून ते घर भाड्याने देऊन पैसा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. इम्रान खान आता या घरात राहात नाहीत, पण ते घर भाड्याने देण्याचे सरकारने ठरविले आहे.

या घरात आता सांस्कृतिक कार्यक्रम, शैक्षणिक शिबिरे, इतर कार्यक्रम आयोजित करता येणार आहेत. त्यासाठी लोकांना भाडे द्यावे लागेल. पाकिस्तानातील समा टीव्हीने हे वृत्त दिले आहे.

इम्रान खान यांच्या या घरातील सभागृह, दोन अतिथीगृहे, लॉन हे आता भाड्याने दिले जाणार आहेत.

सत्तेत आल्यानंतर प्रारंभीच्या दिवसात सरकारी खर्चात कपात करण्याचा इम्रान यांनी प्रयत्न केला होता, पण तो डोलारा आता सावरणे कठीण झाल्यामुळे पैसा उभारण्यासाठी आता घरच भाड्याने देण्याची वेळ त्यांच्या सरकारवर आली आहे.

हे ही वाचा:
जेंव्हा मोदी विरोधकांची आपसातच जुंपते….

ज्यांना नीट वाचता येत नाही, त्यांनी केंद्राला सल्ले देण्याचा उद्योग बंद करावा

पूरग्रस्तांना ११,५०० नाही, तर केवळ १५०० कोटींची तातडीची मदत

मनसुख हिरेनच्या हत्येसाठी दिली होती ४५ लाखांची सुपारी

पाकिस्तानचे माजी अर्थमंत्री मिफता इस्माइल यांनी आरोप केला आहे की, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे अर्थव्यवस्थेशी खेळत आहेत. सरकारी आणि राज्यांच्या कर्जात आता प्रचंड वाढ झाली असून ती ४५ हजार अब्जांच्या घरात पोहोचली आहे.

Exit mobile version