‘पुष्पा’च्या नृत्यावर ‘इम्रान खान’ थिरकला

‘पुष्पा’च्या नृत्यावर ‘इम्रान खान’ थिरकला

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर सातत्याने टीका होत असते. अनेकदा त्यांना सोशल मीडियावर ट्रोल केले जात असते. पुष्पा चित्रपटाच्या व्हिडिओची क्रेझ पाहता यातूनही त्यांची सुटका झालेली नाही. त्यांची खिल्ली उडविणारे व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या तुफान चर्चेत आहे.

देशातील कर्ज कमी करण्याचे आश्वासन देत सत्तेत आलेल्या इम्रान खान याच्या कारकिर्दीत मात्र पाकिस्तान कर्जबाजारी झाले आहे. एकीकडे पाकिस्तानमध्ये महागाई वाढत असताना, पाकिस्तानी रुपया देखील कठीण परिस्थितीत सापडत चालला आहे. या सगळ्या घसरगुंडीमुळे पाकिस्तान सध्या चीनवर अवलंबून आहे. पाकिस्तानच्या या घसरत्या आर्थिक परिस्थितीवरून इम्रान खान यांना ट्रोल केले जात आहे. व्हिडिओमध्ये इम्रान खान यांचे व्यंग काढून त्याला श्रीवल्ली गाण्यावर नाचताना दाखविले आहे.

गतवर्षी पाकिस्तानी रुपया सर्वात वाईट कामगिरी करणाऱ्या चलनांपैकी एक आहे. आर्थिक व्यवस्था स्थिर करण्यासाठी पाकिस्तान आयएमएफकडे गेल्याची माहिती समोर आली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात पाकिस्तानला विविध स्त्रोतांकडून कर्ज घेण्याचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे या देशासमोर विविध राजकीय आणि आर्थिक आव्हाने उभी राहतील. वास्तविक, दिवाळखोर घोषित होण्यापासून वाचवण्यासाठी पाकिस्तान सतत कर्ज घेत आहे. पाकिस्तानने गेल्या सहा महिन्यांत दहा अब्ज डॉलरचे कर्ज घेतले आहे. जे गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत ७८ टक्क्यांनी जास्त आहे.

हे ही वाचा: 

मालदीवमध्ये भारत विरोधी घोषणा दिल्यास होणार ही शिक्षा

क्रिप्टोकरन्सीसाठी पोलिसानेच केले व्यापाऱ्याचे अपहरण

सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीचा निर्णय राज्य सरकार बदलणार?

संजय राऊत, पटोलेंनी भाजपाला केले पराभूत

 

युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्रामच्या प्रकाशित गुंतवणुकीच्या अहवालानुसार, आरोग्य, शिक्षण, औद्योगिक विकास इत्यादी क्षेत्रात आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांसोबत धोरणात्मक भागीदारीचे पाकिस्तान सरकारचे प्रयत्नही अयशस्वी ठरत आहेत. सतत वाढत चाललेल्या चालू खात्यातील असमतोलावर मात करण्यासाठी आणि स्थिरता राखण्यासाठी पाकिस्तान संघर्ष करत आहे.

Exit mobile version