पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान हे भ्रष्टाचाराच्या आरोपात दोषी ठरल्यामुळे त्यांना ८ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या राष्ट्रीय निवडणुकांमध्ये उभे राहण्यास अपात्र ठरवण्यात आले आहे. खान यांनी दोन मतदारसंघांतून उभे राहण्यासाठी केलेला अर्ज पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने फेटाळून लावला आहे.
एप्रिल २०२२मध्ये इम्रान खान यांना पाकिस्तानच्या पंतप्रधानपदावरून पदच्युत करण्यात आल्यापासून ते राजकीय आणि कायदेशीर लढा देत आहेत. सन २०१८ ते २०२२ या कालावधीत पंतप्रधानपदी असताना त्यांनी त्यांना भेट म्हणून मिळालेल्या वस्तूंची बेकायदा विक्री केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. त्यात ते दोषी आढळल्याने ते तीन वर्षांपासून तुरुंगात आहेत. लोकांनी त्यांना सार्वजनिकरीत्या पाहिलेलेही नाही.
खान यांना भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे ८ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या राष्ट्रीय निवडणुका लढवण्यास अपात्र ठरवण्यात आले आहे, परंतु तरीही त्यांनी शुक्रवारी निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला, असे त्यांच्या मीडिया टीमने सांगितले.
खान हे त्या मतदारसंघातील नोंदणीकृत मतदार नाहीत आणि त्यांना न्यायालयाने दोषी ठरवल्याने त्यांना अपात्र ठरवण्यात आले आहे. त्यामुळे खान यांचा नामनिर्देशन अर्ज फेटाळण्यात आल्याचे पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने स्पष्ट केले.
हे ही वाचा:
‘सर्व निर्णय घेताना प्रथम असते फक्त राष्ट्रहित’!
३१ वर्षे पोलिसांना गुंगारा देणारा आरोपी सापडला जाळ्यात!
नववर्षाच्या सेलिब्रेशनमध्ये मुंबई पोलिसांना धमकीचा फोन!
२२ जानेवारीला राज्यात दिवाळी साजरी करूयात!
लाहोरमधील फेटाळलेल्या उमेदवारांची यादी जाहीर करताना आयोगाने ही माहिती दिली. तर, आयोगाने खान यांचा घरचा मतदारसंघ असलेला मिआनवाली येथील उमेदवारी अर्जही फेटाळून लावल्याचे खान यांच्या मीडिया टीमने सांगितले.
देशातील सर्वात लोकप्रिय नेता असलेले खान यांनी ‘शक्तिशाली पाकिस्तानी लष्कर आपल्याला लक्ष्य करत असून त्यांना निवडणुकीपासून दूर ठेवू इच्छित आहेत,’ असा आरोप केला होता. तर, उच्च न्यायालयाने निवडणूक लढवण्यासाठी अपात्र ठरवण्याच्या दिलेल्या निर्णयाला स्थगिती देण्यास पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने गेल्या शुक्रवारी नकार दिल्याच्या एका दिवसानंतर, देशाची गुपिते फोडल्याच्या प्रकरणात खान यांना जामीन मंजूर केला.