पंतप्रधान पदाची खुर्ची जाण्याची चिन्ह दिसताच इम्रान खान यांची भारतावर स्तुतिसुमने

पंतप्रधान पदाची खुर्ची जाण्याची चिन्ह दिसताच इम्रान खान यांची भारतावर स्तुतिसुमने

Pakistani Prime Minister Imran Khan. (File Photo: IANS)

पाकिस्तानमधील राजकारणात सध्या मोठ्या हालचाली सुरू आहेत. पाकिस्तानमध्ये इम्रान खान यांच्या पंतप्रधान पदाच्या खुर्चीबाबत आज, ९ एप्रिल रोजी अंतिम निकाल होणार आहे. इम्रान खान यांच्यावरील अविश्वास प्रस्तावावर आज मतदान होणार असून सकाळी ११ वाजेपासून पाकिस्तानच्या संसदेच्या कामाला सुरुवात होईल.

दरम्यान पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी काल देशवासियांना संबोधित केले. या भाषणात त्यांनी पुन्हा एकदा भारताचे कौतुक केले आहे. “मी भारतातील लोकांना इतरांपेक्षा अधिक जाणतो. मला वाईट वाटतंय की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारधारा आणि काश्मीरमधील परिस्थितीच्या कारणामुळे संबंध बिघडले. भारताबाबत काही बोलण्यास कुणाची हिंमत नाही. कुणा परदेशी ताकदीची हिंमत नाहीय की, भारताच्या परराष्ट्रीय धोरणात हस्तक्षेप करेल. भारत एक स्वाभिमानी देश आहे,” अशी स्तुतिसुमने इम्रान खान यांनी भारतावर उधळली आहेत.

यापूर्वीही त्यांनी भारताच्या परराष्ट्र धोरणांचे आणि लष्कराचे कौतुक केले होते. “भारत हा क्वाडचा सदस्य आहे. एवढेच नाही तर युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका देखील या संघटनेचा सदस्य आहे. पण भारत अजूनही स्वतःला तटस्थ म्हणवून घेत आहे. रशियावर अनेक निर्बंध असूनही भारत रशियाकडून तेल आयात करत आहे. भारत हे असे करत आहे कारण त्याचे परराष्ट्र धोरण हे नागरिकांसाठी आहे आणि मुक्त आहे,” अशा शब्दात त्यांनी भारताचे कौतुक केले होते. भारताचे लष्कर कधीच राजकीय बाबींमध्ये हस्तक्षेप करत नसल्याचे त्यांनी म्हटले होते.

दरम्यान त्यांनी भाषणात शांततेचं आवाहन करताना म्हटलं की, “रविवारी नमाजानंतर सर्वांनी बाहेर पडा आणि शांततेनं आंदोलन करा. या निदर्शनांदरम्यान तोडफोड करायची नाही. तुम्ही दाखवून द्यायचं आहे की तुम्ही तुमच्या भविष्यासाठी बाहेर पडला आहात.”

हे ही वाचा:

थप्पड प्रकरणामुळे स्मिथला १० वर्षे ऑस्कर सोहळ्यात उपस्थित राहता येणार नाही

गुणरत्न सदावर्तेंना अटक

पाच लाख दिव्यांपासून साकारली जाणार प्रभू रामचंद्रांची भव्य कलाकृती

नेते कुठल्याही पक्षाचे असोत, घरांवर अशी आंदोलने समर्थनीय नाहीत.

इम्रान खान यांनी भारताचं कौतुक करताच माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या कन्या मरियम नवाज शरीफ यांनी इम्रान खान यांच्यावर टीका केली आहे. मरियम नवाज शरीफ यांनी म्हटलं आहे की, “खुर्ची जात असल्याचे दिसत असल्याने हा व्यक्ती वेडा झालाय. भारत तुम्हाला जर एवढाच आवडतो तर पाकिस्तान सोडून भारतात जाऊन राहावं,” अशी टीका त्यांनी केली आहे.

Exit mobile version