पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कालच्या मुलाखतीत योगी आदित्यनाथ यांचे कौतुक केले आहे. योगीजींनी उत्तर प्रदेशमध्ये अशक्य गोष्टी शक्य करून दाखवल्या आहेत. उत्तर प्रदेशातील पहिल्या टप्प्यातील मतदानापूर्वी बुधवारी एएनआयशी बोलताना पंतप्रधानांनी योगीजींचे भरभरून कौतुक केले आहे.
यूपीमधील विकास योजनांबाबत अखिलेश यादव यांच्या दाव्यांबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, योगीजींनी यूपीमध्ये खूप मेहनत घेतली आहे. त्यांच्या योजनांना विरोधक विरोध करत नाहीत तर ते पाठिंबा देण्यासाठी मैदानात उतरतात हे पाहून मला आनंद होतो. याचा अर्थ योगीजींची योजना चांगली आणि यशस्वी आहे. त्यांनी उत्तर प्रदेशमध्ये अशक्य गोष्टी शक्य करून दाखवल्या आहेत, यात मी ते योगीजींचे श्रेय मानतो. असे म्हणत पंतप्रधानांनी योगीजींचे कौतुक केले आहे.
यूपीमधील गुन्हेगारी कमी करण्याच्या प्रश्नावर पीएम मोदी म्हणाले की, जेव्हा लोक सुरक्षेबद्दल बोलतात तेव्हा ते मागील सरकारच्या काळात झालेल्या त्रासांशी तुलना करतात. मागच्या सरकारमध्ये ज्या पद्धतीने माफियावाद चालायचा. बाबूंना माफियांच्या दबावाखाली काम करावे लागले. यूपीच्या जनतेने हे सर्व जवळून पाहिले आहे. आणि त्या तुलनेत सध्या युपीची जनता खूप सुखी आहे.
हे ही वाचा:
मुंबई विद्यापीठाच्या निर्णयावर मंगेशकर कुटुंबीय नाराज
बेरोजगारी, कर्जबाजारीमुळे तीन वर्षात २५ हजार आत्महत्या
सचिन वाझे अनिल देशमुखांविरुद्ध साक्ष देणार; ईडीला लिहिले पत्र
कर्णधार रोहित शर्माच्या डावपेचांसमोर वेस्ट इंडिज संघ क्लिन बोल्ड
आज यूपीची स्त्री बिनधास्त अंधारातही रस्त्यावरून सुरक्षित बाहेर जाऊ शकते. याचे कारण म्हणजे आताच्या सरकारची सुरक्षेची धोरणे. पूर्वी गुंडांचे राज्य होते, आता गुंड हात जोडून शरणागती पत्करत आहेत. योगीजींनी सुरक्षेला प्राधान्य दिले आहे. काही लोकांना त्रास होत आहे. कारण तो त्याचा व्यवसाय होता. योगीजींच्या कार्यकाळात आतापर्यंतचा सर्वात मोठा कुंभमेळा झाल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. कुठेही घटना घडली नाही. चोरीही झाली नाही. ही सर्व सुरक्षा व्यवस्था योगीजींनी बनवली आहे.