महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा

The Minister of State for Social Justice & Empowerment, Shri Ramdas Athawale addressing a press conference, in New Delhi on November 24, 2017.

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी यासाठी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी थेट राष्ट्रपतींची भेट घेतली आहे. राष्ट्रपतींना भेटून आठवलेंनी महाराष्ट्रातील परिस्थिती गंभीर असल्याने राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी अशी त्यांना विनंती केली आहे. “जोवर महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार आहे तोवर या गंभीर विषयावर चौकशी होऊ शकत नाही असे मी त्यांना सांगितले. राष्ट्रपतींनी या मागणीचा विचार करू असे सांगितले आहे.” अशी माहिती आठवलेंनी दिली.

भाजपाच्या शिष्टमंडळाने काल राज्यपालांची भेट घेतली. या भेटीनंतर भाजपाच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेतून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारमधील सर्व पक्षांवर हल्ला चढवला. “संजय राऊत हे काही मोठे नेते नाहीत की मी त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरं द्यावीत.” असे सांगत त्यांनी राऊतांवरही हल्ला चढवला. “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे जर या गंभीर विषयावर बोलणार नसतील तर राज्यपालांनी त्यांच्याकडून अहवाल मागवावा अशी विनंती आम्ही राज्यपालांना केली आहे. तसे अधिकार राज्यपालांकडे आहेत. काँग्रेस पक्षानेही स्पष्ट करावं की त्यांना किती ‘कट’ मिळत होता?” असे फडणवीस म्हणाले.

हे ही वाचा:

सोनिया-सुप्रिया भेटीत काय घडलं?

कुणाच्या खांद्यावर वाझेचे ओझे…कौशल इनामदार यांचे भन्नाट विडंबन

मंत्री म्हणून तुम्ही फक्त खंडणीखोरीतच मग्न होतात का? – अतुल भातखळकर

वाझे ठरतोय लादेन मार्गी

परमबीर सिंह यांनी लिहिलेल्या पत्रामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करून ठाकरे सरकार बरखास्त करण्याच्या मागणीला जोर चढला आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी अनेकवेळा ही मागणी विधानसभेत आणि विधानसभेबाहेरही केली आहे.

Exit mobile version