देशव्यापी लॉकडाऊन करा

देशव्यापी लॉकडाऊन करा

देशातील कोरोनाचं संकट दिवसेन्दिवस वाढत आहे. त्यावर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी चिंता व्यक्त केली आहे. देशातील कोरोनाचा संसर्ग रोखायचा असेल तर संपूर्ण लॉकडाऊन करण्याशिवाय पर्यायच नाही, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

राहुल गांधी यांनी ट्विट करून ही मागणी केली आहे. केंद्र सरकार परिस्थिती समजून घेत नाही. कोरोनाचा संसर्ग रोखायचा असेल तर संपूर्ण लॉकडाऊन करणं हाच त्यावर पर्याय आहे. मात्र, लॉकडाऊन करण्यापूर्वी गरीबांना न्याय आणि संरक्षण दिलं पाहिजे. केंद्र सरकारच्या निष्क्रियतेमुळे अनेक लोकांना प्राणास मुकावे लागत आहे, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

राहुल गांधी यांनी कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळी देशात लॉकडाऊन करण्यास विरोध केला होता. केंद्र सरकारच्या या निर्णयाचा गरीबांना सर्वाधिक फटका बसल्याचं त्यांनी म्हटलं होतं. लॉकडाऊनमुळे व्हायरसला हरवलं जाऊ शकत नाही, असं त्यांनी अनेकदा स्पष्ट केलं होतं. लसीकरण आणि कोरोना रोखण्यात येत असलेल्या अपयशावरून राहुल यांनी केंद्र सरकारवर सातत्याने निशाणा साधला आहे. लसीकरण अत्यंत धीम्यागतीने होत असल्याबद्दलही त्यांनी सोमवारी केंद्रावर टीका केली होती.

हे ही वाचा:

आयपीएल २०२१ कोरोनामुळे रद्द

लक्षात ठेवा, टीएमसीचे खासदार, मुख्यमंत्री दिल्लीतसुद्धा येतात- प्रवेश सिंह वर्मा

मुंबईत ‘ड्राईव्ह इन’ लसीकरणाला सुरवात

यंदा राज्यात पाणी टंचाई नाही, वाचा सविस्तर…

त्यांनी एका वृत्तवाहिनीला नुकतीच एक मुलाखत दिली होती. त्यातही त्यांनी सरकारव टीका केली होती. केंद्र सरकार सुरुवातीपासूनच कोविडचा संसर्ग रोखण्यात अपयशी झाली आहे. अनेकदा इशारे देऊनही केंद्र सरकारने कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पाहिजे त्या प्रमाणात पावलं उचलली नाहीत, असं राहुल यांनी म्हटलं होतं. केंद्राने राज्यांवर लॉकडाऊनचा निर्णय सोपवला आहे. हा हात झटकण्याचा प्रकार असल्याची टीकाही त्यांनी केली होती.

Exit mobile version