27 C
Mumbai
Sunday, November 24, 2024
घरराजकारणदिवाळीनंतरच्या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत महायुती सरकारचे महत्त्वाचे निर्णय

दिवाळीनंतरच्या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत महायुती सरकारचे महत्त्वाचे निर्णय

राज्यातील पीक पाण्यासह दुष्काळी परिस्थितीचाही आढावा घेतला

Google News Follow

Related

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक मंत्रालयात पार पडली. शुक्रवार, १७ नोव्हेंबर रोजी दिवाळीनंतर पार पडलेल्या या पहिल्याच बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या बैठकीमध्ये राज्यातील पीक पाण्यासह दुष्काळी परिस्थितीचाही आढावा घेण्यात आला. शिवाय या बैठकीत मराठवाड्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

राज्यातीस १ हजार ३४५ हेक्टर क्षेत्र सिंचित करण्यात येणार आहे. तर, बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्राम पंचायत योजनेलाही मुदतवाढ देण्यात आली आहे. १ ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट्य गाठण्यासाठी विविध ३४१ शिफारशी करण्यात आल्या आहेत. दिवाळीच्या निमित्ताने मंत्री आज बैठकीत उपस्थित नव्हते. पण तरीही मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली.

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेले निर्णय 

  • मंगरूळपीर येथील सत्तर सावंगा बॅरेजला मान्यता. १३४५ हेक्टर क्षेत्र सिंचित होणार.
  • राज्यातल्या ग्रामपंचायत इमारतीच्या कामांसाठी निधी वाढवला.
  • बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्राम पंचायत योजनेलाही मुदतवाढ
  • शिक्षण संस्था समूह विद्यापीठे स्थापन करू शकतात. मार्गदर्शक तत्त्वांना मान्यता
  • राज्य आर्थिक सल्लागार परिषदेच्या अहवालाचे सादरीकरण.
  • एक ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट गाठण्यासाठी विविध ३४१ शिफारशी

हे ही वाचा:

मोहम्मद शमीच्या ट्रोलिंगमागे पाकिस्तानचा कट

गाझामधील अल शिफा रुग्णालयात हमासचे भुयार

वर्ल्डकप अंतिम सामन्याआधी हवाई दलाचा विशेष ‘एअर शो’

मुंबईतील हवेतील प्रदूषण रोखण्यासाठी वाहतूक पोलिसांची वाहनांवर कारवाई

कॅबिनेट बैठकीआधी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतली प्रीकॅबिनेट बैठक

कॅबिनेट बैठकीआधी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी प्रीकॅबिनेट बैठक घेतली. य बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे काही मंत्री आणि आमदार उपस्थित होते. महाराष्ट्र आर्थिक सल्लागार परिषद २०२३ चा अहवाल कॅबिनेटसमोर सादर करण्यात आला. त्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ बैठकीआधी अजित पवारांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
195,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा