‘सिल्वर ओक’ हल्ल्याप्रकरणीच्या तपासातून संभाषण पोलिसांच्या हाती

‘सिल्वर ओक’ हल्ल्याप्रकरणीच्या तपासातून संभाषण पोलिसांच्या हाती

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांनी हल्ला केल्यानंतर गुणरत्न सदावर्ते यांना अटक करण्यात आली. दरम्यान या प्रकरणाच्या तपासात संदीप गोडबोले आणि अभिषेक पाटील यांचे संभाषण याला पोलिसांच्या हाती लागले आहे.

तपासातून मिळालेल्या या संभाषणावरून हा हल्ला पूर्वनियोजीत असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पोलिसांच्या हाती अभिषेक पाटील आणि नागपुरातून ताब्यात घेतलेला संदीप गोडबोल याचे संभाषण हाती लागले आहे.

काय आहे संभाषण?

अभिषेक- हॅलो

संदीप- बोल, अभिषेक

अभिषेक- तिथेच जाऊ का?

संदीप- हा. तिथेच जायचंय.

अभिषेक- आम्ही त्या बंगल्याच्या इथे चपला सोडल्या, आम्ही अगोदर आलो, आम्ही फोटो पण काढलेत. तिथे आता लय लोक आलेत. काढले ना लोक म्हणून तर हे काय झाले साहेब, करावं तर सगळं आपणचं करावं, बाकीच्यांनी निवांत बसावं. इथे येऊन साहेबांना लगेच सांगितलं, मुदलियार पाटील आताच आलेत. रात्रभर मैदानात होते. सकाळी ९ पर्यंत आंघोळ करून पण येऊ नये का?

संदीप- आता कुठे आहेत तुम्ही?

अभिषेक- इथे सगळ्या महिला घेतल्यात. डायरेक्ट त्यांना तिकिटांना पैसे दिलेत. तिकिट काढलेत निघालेत सगळे. ७० ते ८० महिला आणि माणसं आहेत १०० ते २००.

संदिप- महालक्ष्मी पेट्रोलपंप कुठे आहे विचारा.

अभिषेक- बर पेट्रोलपंपावर ना. मीडिया आली?

संदिप- मीडिया आली आहे?

अभिषेक- चला मीडिया आली भाऊ

संदीप- हो

हे ही वाचा:

गुणरत्न सदावर्ते सातारा पोलिसांच्या ताब्यात

… म्हणून कंपनीने १०० कर्मचाऱ्यांना कार भेट दिल्या

राज ठाकरे यांनी पत्रकारांना का हाणले ?

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी एनसीबीचे दोन अधिकारी निलंबित

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या मुंबईतील ‘सिल्वर ओक’ या निवासस्थानी काही एसटी कर्मचाऱ्यांनी अचानक हल्ला केला होता. शरद पवार यांच्या घरावर चप्पलफेक आणि दगडफेक कर्मचाऱ्यांकडून करण्यात आली होती. यावेळी माध्यमांची लोक तिथे पोहचले होते पण पोलीस यंत्रणांना पोहचण्यास विलंब झाल्याने अनेक नेत्यांनी पोलीस यंत्रणेवर टीकास्त्र सोडले होते. या घटनेनंतर पोलिसांनी कारवाई करत गुणरत्न सदावर्ते आणि १०९ एसटी कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले होते.

Exit mobile version