आगामी विधानसभा निवडणुकांसाठी भाजपाची महत्वाची बैठक

आगामी विधानसभा निवडणुकांसाठी भाजपाची महत्वाची बैठक

चार राज्यांमध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांसाठी भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक आज दिल्लीत पार पडली. या बैठकीत, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि इतर नेते सामील होते. या बैठकीत आसाम, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळ या चार राज्यांसोबतच, पुद्दुचेरीमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी उमेदवार निश्चित करण्याविषयी चर्चा झाली.

चार राज्यांपैकी केवळ आसाममध्ये भाजपाचा मुख्यमंत्री आहे. तामिळनाडूमध्ये २३४ पैकी भाजपाकडे शून्य आमदार आहेत. तर केरळमध्ये १४० पैकी केवळ एक. पश्चिम बंगालमध्ये भाजपाकडे २९४ पैकी केवळ तीन आमदार आहेत. पश्चिम बंगालमध्ये या निवडणुकीत मात्र चित्र फार वेगळं आहे. भाजपा सत्तेत येणार का नाही? एवढाच केवळ प्रश्न आहे. २०१६ मधील चौथ्या क्रमांकावरून भाजपा दुसऱ्या क्रमांकावर येणार हे जवळपास निश्चित आहे. याचे कारण म्हणजे २०१९ ची लोकसभा निवडणूक. या निवडणुकीत भाजपाला २९४ पैकी १२२ जागांवर आघाडी होती. त्यामुळे भाजपाचे सर्व नेते बंगालमध्ये सर्व शक्ती पणाला लावणार, यामध्ये शंकाच नाही.

हे ही वाचा:

शिवसेनेची एमआयएमशी हातमिळवणी

इस्लामी कट्टरतावादाविरुद्ध श्रीलंकेचे दमदार पाऊल

बंगाल निवडणुकीच्या तोंडावर ‘या’ बंगाली नेत्याला काँग्रेसने हटवले

यशवंत सिन्हा झाले तृणमूलवासी

आसाममध्ये भाजपा सत्तेत आहे. भाजपाकडे अर्थमंत्री हिमंता बिस्व सर्मा आणि मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्यासारखे लोकप्रिय स्थानिक नेते आहेत. परंतु काँग्रेस आणि एआययूडीएफ या बद्रुद्दीन अजमल यांच्या पक्षाने युती केल्यामुळे भाजपाला या निवडणुकीत तगड्या विरोधी पक्षाचा सामना करावा लागणार आहे. काँग्रेस आणि एआययूडीएफ एकत्र आल्याने आसाममधील मुस्लिम मतांचं विभाजन न होता, ती मतं एकत्रितपणे या दोन पक्षांना जातील असा अंदाज आहे. आसाममध्ये काश्मीर व्यतिरिक्त, सर्वाधिक म्हणजेच ३३% मुस्लिम लोकसंख्या आहे. याशिवाय बेकायदीशीर बांगलादेशी मुस्लिमसुद्धा मोठ्या प्रमाणात आसाममध्ये आहेत.

केरळ आणि तामिळनाडू या दोन्ही राज्यांमध्ये भाजपाला सत्तेत येण्याची संधी तूर्तास दिसत नसली तरी आमदारांची संख्या आणि मतांची टक्केवारी वाढवण्यावर भाजपाचा भर असेल अशी माहिती मिळत आहे.

Exit mobile version