मध्यप्रदेशमध्ये मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या लाडली योजना निश्चितच यश आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली आहे. पुण्यात त्या पत्रकारांशी बोलत होत्या. भारतीय जनता पक्षाला मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगढ या राज्यात मिळालेल्या यशानंतर खासदार सुळे बोलत होत्या. मध्य प्रदेशमध्ये लाडली योजनेची मोठी चर्चा झाली. शिवराजसिंह चौहान यांना मामाजी म्हणून मध्यप्रदेशमध्ये ओळखले जाते. त्यांच्या कल्पनेतील ही योजना आणि त्यांचे नेतृत्व मध्यप्रदेशच्या विजयात महत्वपूर्ण ठरली, असे खासदार सुळे म्हणाल्या.
राजस्थानमधील भाजपच्या विजयाबाबत विश्लेषण करावे लागले. काँग्रेसच्या रेवांत रेड्डी यांनी ज्या प्रकारे आघाडी घेतली त्यावरून त्यांचे नेतृत्व तेलंगणासाठी उपयुक्त ठरले. बीआरएसचे केसीआर यांनीही तेलंगणामध्ये चांगल्या योजना राबविल्या होत्या. मात्र तेथे त्यांना अपेक्षित यश मिळाले नाही तर मध्यप्रदेशात योजनेचा परिणाम झाला. योजनांचा प्रभाव आणि मतांची टक्केवारी पूर्ण निकाल हाती आल्यानंतर स्पष्ट होईल, असेही खासदार सुळे म्हणल्या.