27 C
Mumbai
Wednesday, November 6, 2024
घरराजकारणस्वतःच्या सुनेला अधिकार न देणारे तौकीर महिलांना काय न्याय देणार?

स्वतःच्या सुनेला अधिकार न देणारे तौकीर महिलांना काय न्याय देणार?

Google News Follow

Related

उत्तर प्रदेशमधील आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला पाठींबा देण्याची घोषणा करणारे मुस्लिम धर्मगुरू आणि इत्तेहाद-ए-मिल्लतचे (आयएमसी) अध्यक्ष तौकीर रझा खान यांच्यावर त्यांच्या सुनेने गंभीर आरोप केले आहेत. सून निदा खान यांनी माध्यमांशी बोलताना तौकीर रझा खान यांच्यावर महिलांसोबत करत असलेल्या वर्तणूकीबद्दल वक्तव्य केले आहे.

निदा खान यांनी म्हटले की, काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी ‘लडकी हूं; लढ सकती हूं’ असा नारा दिला आहे. तौकीर रझा खान यांनी याला पाठींबा देणार असल्याची घोषणा केली. मात्र, तौकीर हे स्वतःच्या घरातील मुली आणि महिलांचा आदर करत नाहीत, असा आरोप निदा खान यांनी केला आहे. सासरच्या मंडळींकडून त्यांचा छळ करण्यात आला आणि त्यांना तिहेरी तलाक देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

महिलांना पाठींबा देणार असल्याचे अनेक विधाने तौकीर रझा खान करत असतात. प्रत्यक्षात पाठींबा दिला असता तर घरातील सुनेला योग्य न्याय मिळाला असता असे निदा खान यांनी सांगितले. स्वतःच्या सुनेला हक्क आणि अधिकार न देणारा व्यक्ती इतर महिलांच्या हक्क, अधिकाराबद्दल कसे बोलू शकतो असा सवाल निदा खान यांनी उपस्थित केला आहे. आगामी निवडणुकीसाठी मतदारांना घोळवण्याचा हा प्रयत्न असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

हे ही वाचा:

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जगात नंबर वन 

टी- २० वर्ल्डकप मध्ये भारत पाकिस्तान लढत होणार या दिवशी

लाखभर रुपये घेऊन विकत होते प्रमाणपत्र; पोलिसांनी आवळल्या मुसक्या

नस्ती ‘किटकॅट’; चॉकलेटवर भगवान जगन्नाथाचा फोटो

निदा खान यांनी समाजवादी पार्टी (सपा) सरकारवरही गंभीर आरोपही केले आहेत. सपा सरकारमध्ये आमच्यावर खोटे खटले लिहिण्यात आल्याचे निदा खान हिने म्हटले आहे. भाजपचे सरकार आल्यावर हे सगळे बंद झाले आहे. २०१५ मध्ये लग्न झाल्यावर लग्नानंतर एका परीक्षेला गेली असताना पेपर सुरू असताना घरी बोलावण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. घरातील महिलांनी शिक्षण घ्यायचे नाही असे स्पष्टीकरण देण्यात आले. त्यानंतर हुंड्यावरून भांडण आणि मारहाण करण्यात आली. तसेच न्यायालयात गेले असता सपाचे सरकार आहे आणि सरकार माझ्या खिशात आहे, असे सांगण्यात आले, असा आरोप निदा खान यांनी केला आहे. एकाही पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला गेला नव्हता. भाजप सरकार आल्यावर खटले भरले गेल्याचे त्यांनी सांगितले. आज इतकी वर्षे झाली पण त्यांनी घरच्या सुनेला न्याय दिला नाही, मग बाहेर काय करणार? असा सवाल निदा खान यांनी विचारला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
187,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा