मालवणीतील दुर्घटनेमुळे अनधिकृत बांधकामांचा मुद्दा ऎरणीवर

मालवणीतील दुर्घटनेमुळे अनधिकृत बांधकामांचा मुद्दा ऎरणीवर

मुंबईतील मालाड पश्चिमेकडील मालवणी भागातील इमारत दुर्घटनेत आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाला आहे. या मृतांमध्ये ६ लहान मुलांचा समावेश आहे. तर ८ जण गंभीर जखमी झाले आहे. ही दुर्घटना मालवणी भागातील अनधिकृत बांधकामं आणि त्याकडे असलेले प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष या बाबी दर्शवते असा आरोप भाजपाकडून करण्यात येत आहे. भाजपाचे नेते आणि आमदार असलेल्या मंगल प्रभात लोढा आणि भाजपाचे नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी या विषयावर ट्विट केले आहे.

” मालवणी परिसरात पावसामुळे इमारत कोसळून ११ जणांचा मृत्यू झाला आणि ७ जण जखमी झाले आहेत. या सर्वांबद्दल संवेदना व्यक्त करतो. या दुर्घटनेमुळे या परिसरातील अवैध बांधकामाचा प्रश्न पुन्हा समोर आला आहे. मी स्थानिक प्रशासनाला विनंती करतो की या प्रकरणात त्यांनी लक्ष द्यावं.” असं ट्विट मुंबई भाजपाचे अध्यक्ष आणि आमदार मंगल प्रभात लोढा यांनी केलं आहे.

“सरकारी यंत्रणा झोपा काढतायत. निर्दोषांचे बळी जातायत. मालवणी येथे इमारत कोसळून मृत पावलेल्या ११ नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली.” असं ट्विट मुंबई भाजपाचे प्रभारी आणि आमदार अतुल भातखळकर यांनी केलं आहे.

मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत बुधवारी (९ जून) रात्री ११ वाजता ही दुर्घटना घडली. मालाड पूर्व या ठिकाणी मालवणी गेट क्र. ८ येथे अब्दुल हमीद मार्गावर न्यू कलेक्टर कंपाऊंड परिसरात एका ३ मजली इमारतीचा दुसरा व तिसरा मजला बाजूला असलेल्या १ मजली चाळीवर कोसळला. त्यामुळे मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली अडकलेल्या ११ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर ८ जण गंभीर जखमी झाले आहे.

हे ही वाचा:

कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा लाखापेक्षा कमी

आमचा लढा डॉक्टरांच्या विरोधात नसून औषधं माफियांच्या विरोधात

सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये होणार आयपीएलचे उर्वरित सामने

मालाडच्या मालवणीत बिल्डींग कोसळून ११ जणांचा मृत्यू

Exit mobile version