मिलिंद नार्वेकरांच्या बंगल्यावर फिरला बुलडोझर, सोमैय्या म्हणतात ‘पुढचा नंबर…’

मिलिंद नार्वेकरांच्या बंगल्यावर फिरला बुलडोझर, सोमैय्या म्हणतात ‘पुढचा नंबर…’

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्विय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांचा दापोली येथील बंगल्यावर बुलडोझर फिरवण्यात आला आहे. रविवार, २२ ऑगस्ट रोजी ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईच्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीचे नेते किरीट सोमैय्या पुन्हा एकदा आक्रमक झाले असून त्यांनी शिवसेनेवर हल्ला चढवला आहे. मिलिंद नार्वेकर नंतर पुढचा नंबर महाविकास आघाडी सरकारमधील एका मंत्र्यांचा असल्याचे सोमैय्या यांनी म्हटले आहे.

शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर ह्यांचा मुरुड, दापोली या ठिकाणी एक आलिशान बंगला आहे. हा बांगला बेकायदेशीर असल्याची तक्रार भाजपा नेते माजी खासदार किरीट सोमैय्या यांनी केली होते. या बंगल्याचे बांधकाम करताना आवश्यक त्या परवानग्या घेण्यात आल्या नसल्याचे सोमैय्या यांनी म्हटले होते. त्यानंतर आता मिलिंद नार्वेकर यांच्या बंगल्याचे तोडकाम सुरु झाले आहे.

हे ही वाचा:

यंदा गणेशोत्सव मंडळांचा उत्साह फिका

त्या मुलीने अचूक ओळखले ‘छोटे सर’ला आणि पाठवले तुरुंगात

कल्याण स्थानकात गर्दुल्यांची गर्दी

एसटीच्या लोगोलाच केला ‘जय महाराष्ट्र’

आज सकाळपासूनच नार्वेकर यांचा बांगला जमीनदोस्त करायला सुरवात झाली. जेसीबी लावून हा बांगला तोडण्यात आला. बंगल्याची वीट अन वीट तोडली गेली. या कारवाई नंतर भाजपा नेते किरीट सोमैय्या आक्रमक झाले. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. यावेळी सोमैय्या यांनी तोडकामाचा व्हिडिओ देखील शेअर केला आहे.

पुढचा नंबर अनिल परबांचा
मिलिंद नार्वेकर यांच्या नंतर आता पुढचा नंबर शिवसेना मंत्री अनिल परब यांचा आहे असा दावा सोमैय्या यांनी केला आहे. सोमैय्या हे गेल्या काही महिन्यांपासून अनिल परब यांच्या मागे हात धुवून लागले आहेत. अनिल परब यांचे दापोली येथील समुद्र किनारी एक अनधिकृत रिसॉर्ट असल्याचे आरोप सोमैय्या यांनी केले आहेत. नार्वेकरांवर कारवाई झाल्यानंतर आता परब यांच्या रिसॉर्टवर देखील हातोडा पडणार असल्याचा दावा सोमैय्या यांनी केला आहे.

Exit mobile version