29 C
Mumbai
Thursday, December 26, 2024
घरराजकारणइलया राजा, पी.टी. उषा राज्यसभेत जाणार; पंतप्रधान मोदींकडून स्तुती

इलया राजा, पी.टी. उषा राज्यसभेत जाणार; पंतप्रधान मोदींकडून स्तुती

Google News Follow

Related

सुप्रसिद्ध संगीतकार इलया राजा, सुवर्णकन्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धावपटू पी. टी. उषा, गरीबांसाठी झटणारे वीरेंद्र हेगडे, दिग्दर्शक आणि पटकथाकार व्ही. विजेंद्र प्रसाद यांची बुधवारी राज्यसभेसाठी नामनिर्देशित सदस्य म्हणून निवड करण्यात आली.

हे चारही जण तामिळनाडू, केरळ, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशचे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून या साऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

पद्मभूषण विजेत्या इलया राजा यांच्याबद्दल मोदींनी म्हटले आहे की, अनेक पिढ्यांना इलया राजा यांनी आनंद दिला आहे. त्यांच्या कामातून भावभावनांचे एक छान प्रतिबिंब उमटते. एका अत्यंत साध्या कुटुंबात जन्मलेल्या इलया राजा यांनी लोकप्रियतेचे शिखर गाठले. राज्यसभेसाठी त्यांचे नामांकन झाले आहे याचा आनंद आहे.

पंतप्रधान मोदी यांनी पद्मश्री आणि अर्जुन पुरस्कार विजेत्या पी. टी. उषा यांचेही कौतुक केले. तमाम भारतीयांसाठी पी. टी. उषा या आदर्श आहेत. त्याशिवाय, अनेक उदयोन्मुख धावपटूंना घडविण्याचे कामही त्यांच्या देखरेखीखाली होत आहे, असेही मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

हे ही वाचा:

पंढरपूरसाठी आषाढीला जाणाऱ्यांना आता टोलमाफी

जीएसटी फायद्यात ‘जमा’

संजय राऊत खलनायक कसे?

शिवसेना आमदारांनंतर शाखाप्रमुखांची राजीनामा मालिका

 

आणखी एका ट्विटमध्ये पंतप्रधानांनी धरमशालाच्या धर्माधिकाऱ्यांचे अभिनंदन केले असून वीरेंद्र हेगडे यांचे नामही निर्देशन झाल्याबद्दल शिवसेनेलाही सांगितलेले नाही. वीरेंद्र हेगडे यांच्याबद्दल मोदींनी ट्विट केले आहे की, समाजसेवेचे महान कार्य ते करत आहेत. धरमशाला मंदिरात मला प्रार्थना करण्याची संधी मिळाली होती, आरोग्य, शिक्षण आणि संस्कृती या क्षेत्रातील त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे. राज्यसभेचे खासदार झाल्यामुळे संसदीय कार्यपद्धतीचा दर्जा आणखी उंचावणार आहे.

पंतप्रधान मोदी यांनी विजेंद्र प्रसाद यांचेही अभिनंदन केले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा